अंगावर रंग टाकू नका, पडलाच तर भांडू नका
होळी रमजानच्या पार्श्वभूमीवर सौहार्द जपण्याचे आवाहन
भारतीय संस्कृती विधतेत एकता
जामखेड प्रतिनिधी
होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर तो प्रेम, सौहार्द आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. हा सण सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणतो, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात.
होळी हा भारतातील सर्वात आनंदी आणि रंगीबेरंगी सणांपैकी एक आहे. याला “रंगांचा उत्सव” असेही म्हणतात. देशभरातील आणि जगातील इतर काही भागातही लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळी हे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते. देशात सध्या जातीय तेढ निर्माण करणारांचा
होळी आणि रमजान महिन्यात शुक्रवार दिवशी आली आहे. हे योगायोग आहे. या दिवशी नमाजाच्या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लिम बांधवांना शांतता व समाजिक सौहार्दाचे वातावरण जपण्याचे आवाहन आहे. होळीचा सण उत्साहाने साजरा करा. मात्र, मुस्लिमांवर व इतर कोणावरही संमतीशिवाय रंग टाकू नका.
मुस्लिम बांधवांनीही जर अंगावर रंग पडला तर भांडणात उतरू नये. हा क्षमा आणि बंधुत्व साजरे करण्याचा महिना – आहे.आशी होळी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे. 
नाईलाजाने घरात नमाज अदा करता येऊ शकते. मात्र रमजानची नमाज मशिदीत अदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी मशिदीत जाऊन नमाज पठण करावी. जर अंगावर रंग पडला तरी भांडणात उतरू नये. हा महिना बंधुत्वाचा आणि क्षमा करण्याचा आहे. जरी एखाद्याच्या अंगगावर रंग पडला तरी भांडू नका.
दोन धर्मांमधील एकात्मतेची साक्ष देणारी प्रतीके कित्येक वर्षांपासून भक्कमपणे परंपरा जोपासत आहेत. गंगा जमुना परंपरा देशात सर्वत्र विविध कामातुन आढळते.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही सर्व धर्म शिकवण आहे. भारतीय संस्कृती विधतेत एकता आणि सामाजिक सौहार्द सांगते.


प्रतिनिधी यासीन शेख 9423391215