१७ दिवस झाले शेती ट्रांसफार्मर जळाला :
अद्याप कारवाई नाही संतप्त शेतकऱ्यांनी खर्डा सबस्टेशनला ठोकले टाळे.
जामखेड प्रतिनिधी
शेतकर्यांना सतत समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कधी नैसर्गिक समस्या तर कधी प्रशासनाकडुन तर कधी वीज वितरण कंपनीकडून अडवणूकीची समस्या समोर येते. विज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला याला दोन आठवडे होऊन गेले तरी दुसरा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध केला गेला नाही.
ऐन बहरात शेतीपिकाला पाणी देत नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांच्या नेतृत्वाखाली खर्डा येथील विज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी सांगितले की
खर्डा ३३ केवी सबस्टेशन मधील शेतीला वीज पुरवठा करणारा ट्रांसफार्मर १७ दिवसापूर्वी जळाला आहे. पिके बहारात आहेत. अनेक गावांमधील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही याबाबत शेतकरी संघटनेने वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर मागवण्याची विनंती केली होती,परंतु अधिकारी हे निर्ढावलेले असून ते सतत उडवा उडवीचे उत्तरे देत होते.
एन बहारात आलेली पिके पाण्या वाचून जळण्याची शक्यता निर्माण झाली होती.शेतकरी सतत शेतीला वीजपुरवठा करण्याची मागणी करत होते,परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेली १७ दिवसांपासून शेती ट्रांसफार्मर अद्याप पर्यंत त्यांनी मागविला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी दि १७ डिसेंबर रोजी सकाळी खर्डा सब स्टेशनवर शेतकऱ्यांनी मोर्चा नेला असता त्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नव्हते. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी खर्डा सब स्टेशन पूर्णपणे बंद करून ऑफिसला टाळे ठोकले,त्यामुळे खर्डा शहराचा सुद्धा वीजपुरवठा बंद पडला असून खर्डा ग्रामस्थांनी शेती पंपाला ट्रान्सफर येईपर्यंत सहकार्य करावे असे आवाहन सुनील लोंढे यांनी केले आहे.
यावेळी बाळगव्हाणचे सरपंच सचिन शिकारे,सातेफळचे सरपंच आश्रु खूपसे,दादा पाटील,बाळासाहेब धोत्रे,कैलास शिकारे,सुनील मिरगे, संदीप शिकारे, दत्ता भुते,शेषराव भोसले,सुरज लोंढे,सुनील ढेरे, कालिदास भांडवलकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
