Homeव्हिडिओ बातम्याशेतकरयांचा खरा माणुस मंगेश दादा आजबे होय! पै चिराग आजबे यांच्या गावभेट...

शेतकरयांचा खरा माणुस मंगेश दादा आजबे होय! पै चिराग आजबे यांच्या गावभेट दौरयात मोहा येथे भरघोस प्रतिसाद

 

शेतकऱ्यांचा खरा माणूस!
मंगेश दादा आजबे

पै. चिराग आजबे
यांच्या गावभेटीला मोहा ग्रामस्थांचा भरगोस प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी

शेतकरी व सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी वर्षभर लढा देणारे मंगेश दादा आजबे हे निवडणुकी पुरतेच नव्हे तर कायम जनतेसाठी उपलब्ध असणारे नेते म्हणून ओळखले जातात सामान्य माणसांच्या उपयोगी येणारा माणूस म्हणजे मंगेश जाधव आजबे अशी गावागावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. साकत जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पै. चिराग आजबे यांच्या सह मंगेश दादा आजबे यांनी मोहा गावातील शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी नुकताच गाव भेट दौरा केला व या गाव दौऱ्याला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी सांगितले की आत्तापर्यंत हजारो शेतकरी व नागरिकांच्या अडचणी मंगेश दादा आजबे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून सोडविले आहेत दवाखान्याची शासकीय कार्यालयाची किंवा इतर कोणतीही अडचण असो दादा स्वतः फोन करून धाव घेऊन प्रश्न मार्गी लावतात कोविड काळातही त्यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णांना दवाखान्यात नेण्याचे कार्य निस्वार्थपणे केले.कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी पसा पद्धत बंद करून त्यांनी व्यापाऱ्यांचा विरोध पत्करला विजेच्या समस्येसाठी अनेक आंदोलने करून ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावले सध्या नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश दादा आजबे व पै. चिराग आजबे यांनी गाव भेटींचा धडाका लावला असून सर्वच गावांमध्ये त्यांचे स्वागत वाजत गाजत फटाके फोडून होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या सेवाभावाची हीच पोहोचपावती असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!