पावसाच्या पाण्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर केला व्हायरल, सरपंच पतीची ग्रामस्थाला शिविगाळ
गून्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिऊर जवळील फाळकेवाडी येथील शाळेजवळील ओढ्यामध्ये पावसाचे पाणी वाढल्याने मुलांना शाळेत येण्यास अडचण निर्माण झाली.
यामुळे एका ग्रामस्थाने याचा व्हीडिओ काढुन सोशल मिडियामध्ये शेअर केला. यानंतर गौतम उतेकर यांनी या कारणावरून फीर्यादी यांना फोन करून सोशल मिडियावर व्हिडिओ का टाकला.
तु माझी बदनामी का केली? असे म्हणुन म्हणुन फीर्यादीस शिविगाळ केली. याबाबत फीर्यादी दत्तु परमेश्वर फाळके, बिंडावस्ती, फाळकेवाडी यांनी या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी शिऊरचे सरपंच पती गौतम उतेकर यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओ
जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
यावेळी फाळकेवाडी व बिंडावस्ती येथील दत्ता परमेश्वर फाळके, शांतीलाल सुखदेव फाळके, मच्छिंद्र दादा फाळके, दिपक दत्तु इंगवले, बाबु फाळके, विठ्ठल पंढरीनाथ चव्हाण, संतोष आरेकर, मंगेश भिकाजी आरेकर, नाना फाळके, भाऊ फाळके व नाना यादवराव देवकाते हस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
