Homeव्हिडिओ बातम्याराजेवाडी येथे वृध्द दाम्पत्याला चोरट्यांची चाकुने मारहाण करून लुटले: अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा...

राजेवाडी येथे वृध्द दाम्पत्याला चोरट्यांची चाकुने मारहाण करून लुटले: अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल

राजेवाडी येथे वृध्द दाम्पत्याला चोरट्यांची चाकुने मारहाण करत लूटले:
तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील वयोवृद्ध जोडप्याला तीन अज्ञात चोरट्यांनी चाकूने मारहाण करून जखमी केले व त्यांच्या कडील गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन अज्ञात चोरट्यांविरोधात मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ७ ऑगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील खरातवाडी शिवारातील शेतात फिर्यादी सेवक कोंडीबा गोरे व त्यांची पत्नी तोळाबाई सेवक गोरे हे रात्रीच्या सुमारास शेतातील घरासमोरील पडवीत झोपले होते. रात्री अकराच्या सुमारास अंदाजे २२ते २५ वयोगटातील तीन अज्ञात चोरटे घराजवळील पडवीत आले व या दांम्पत्याकडे घराची चावी मागितली यावेळी फिर्यादी चावी शोधत असताना त्यांच्या तोंडावर चाकू मारून जखमी केले. व गळ्यातील बदाम तोडून घेतला तसेच पत्नीला देखील चोरट्यांनी तोंडावर, हातावर, पाठीवर दगडाने मारहाण करत जखमी केले व गळ्यातील डोरले व कानातील झुबे चोरट्यांनी काढून घेतले व पळून जाताना पुन्हा फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले.

या घटनेत चोरट्यांनी कानातील व गळ्यातील एकुण १८ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. जखमी दांपत्यावर रात्री एक वाजता नान्नज च्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. किरणकुमार जाधव यांनी उपचार केले त्यानंतर तोळाबाई गोरे यांची बीपी वाढल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री चोरीची घटना घडताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पोलीस हेड. कॉ.सरोदे यांना घटनास्थळी पाठवले होते. त्या नंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नान्नज पोलीस दुरक्षेत्राचे लोंखडे, पोलीस कॉ. ढोबळे यांनी भेट दिली. दि. ८ रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सीक लॅब व फिंगर प्रिंट पथकास पाचारण करण्यात आले होते.ऍलर्जीया घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे हे करत आहेत.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!