Homeव्हिडिओ बातम्याराजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ, १० वर्षे पोलीसांना गुंगारा देणारा बाबुसेठ टायरवाले...
राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ, १० वर्षे पोलीसांना गुंगारा देणारा बाबुसेठ टायरवाले अटक, सिस्टमवरच प्रश्नचिन्ह
दहा वर्षे पोलीसांना गुंगारा देणारा बाबुशेठ टायरवाले अखेर जेरबंद
राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ
सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह
जामखेड प्रतिनिधी
मागील तब्बल १० वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून मोकाट फिरणारा शिवसेना (शिंदे गट)अहिल्यानगर जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले ऊर्फ बाबू सुब्रमण्यम कांबळत हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. २०१६ मधील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात तो फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली. आष्टी यथील न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या अटकेमुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
१० वर्षांचा ‘फरार’ प्रवास आणि पोलिसांची कारवाई २०१६ साली घडलेल्या एका जीवघेण्या हल्लूयाच्या गुन्ह्यात बाबू सुब्रमण्यम कांबळत याचे नाव मुख्य आरोपी म्हणून निष्पन्न झाले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्या पासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. एक-दोन महिने नव्हे, तर तब्बल एक दशक (१० वर्षे) हा आरोपी राजरोसपणे मोकाट दहा वर्षे पोलिसांना गुंगारा फिरत होता.
तो पोलिसांना का सापडत नव्हता ? हा प्रश्न गेले अनेक दिवस संशयाचे धुके निर्माण करत होता.
अखेर पोलिसांना मिळालेल्या एका खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला आणि बाबुशेठला बेड्या ठोकण्यात तपास यंत्रणांना यश आले. न्यायालयाकडून कोठडी मंजूर अटकेनंतर आरोपीला तातडीने आष्टी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, गुन्ह्याचे गांभीर्य आणि १० वर्षे फरार असल्याचा मुद्दा ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या कोठडीदरम्यान पोलीस तपासात कोणते मोठे खुलासे होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. – – – –

सिस्टीमवरच मोठे प्रश्नचिन्ह !
——-
या अटकेने केवळ एक गुन्हेगार जेरबंद झाला नाही, तर संपूर्ण न्याय आणि पोलीस यंत्रणेवरच अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहिले आहेत. आता शहरात दबक्या आवाजात खालील प्रश्नांची चर्चा रंगत आहे. राजकीय वरदहस्त कुणाचा ? तब्बल १० वर्षे हा आरोपी कोणाच्या राजकीय छत्राखाली सुरक्षित होता? सापडत नव्हता की वाचवला जात होता? सत्ताधारी पक्षाचा ‘जिल्हाप्रमुख’ पदावर असलेला नेता पोलिसांना खरंच सापडत नव्हता की त्याला जाणीवपूर्वक सापडू दिले जात नव्हते ?
—-
प्रशासनाचा डोळेझाकपणा
——
कायद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला एवढी वर्षे मोकाट फिरण्याची मुभा कुणी दिली होती ? पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि राजकीय हस्तक्षेपावर या प्रकरणामुळे आता खुलेआम प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढल्यास आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

——
राजकीय चाल
——-
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूका लढविल्या आहेत. त्यात जिल्हाप्रमुख बाबुसेठ टायरवाले यांनी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेतला होता. अहिल्यानगर महानगरपालिकेत शिंदे गटाला चांगले यश मिळाले आहे. लवकरच जिल्हा परिषद निवडणुका होण्याच्या मार्गावर आहे. मित्रपक्षांची ताकत वाढताना भाजपाला ते देखवत नाही. १० वर्षे राजरोसपणे वावरणारे बाबुसेठ टायरवाले पोलिसांना दिसले नाही का? मग गुप्तचर यंत्रणा आत्ताच जागी कशी झाली? मित्रपक्षाच्या नेत्यांच्या अडचणी निर्माण करत ताकत कमी करण्याची भाजपाची चाल तर नाही अशी चर्चा सुरू आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!