रक्तदान ही आज देशाची गरज बनली आहे: प्रा. मधुकर राळेभात
महासंग्राम युवा मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर
जामखेड प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे गणेश उत्सव उत्सवानिमित्ताने महासंग्राम युवा मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महासंग्राम युवा मंच सतत समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबत आहेत. आज समाजाची गरज ओळखून ती पूर्ण करण्याचे काम या केले जात आहे.
रक्तदान ही आज देशाची गरज निर्माण झाली आहे. हे काम कौतुकास्पद असेच आहे. या आदर्श कामाची प्रेरणा इतर मंडळांनी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते या. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड शहरातील संविधान चौक येथे महासंग्राम युवा मंचच्या जामखेडचा राजा गणेश मंडळ स्थापनेच्या ठिकाणी दि. ३ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, कर्जत नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरूण जाधव, जेष्ठ नेते दत्तात्रय वारे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते राहुल उगले, मनसे हवा सरनोबत, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, शहरप्रमुख देविदास भादलकर, बाजार समितीचे संचालक काकासाहेब गर्जे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अमित जाधव, भानुदास बोराटे, शामीर सय्यद, न्यु अर्पण व्हॉलंटरी रक्तकेंद्र अहिल्यानगरचे प्रमुख डॉ. अजय क्षिरसागर आदि मान्यवर, महासंग्राम युवा मंचचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कर्जत नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, महेश निमोणकर हे गेली १६ वर्षांपासून महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून जामखेड शहरात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत आहेत.
त्याच अनुषंगाने जगात कुठेही कृत्रिमरीत्या निर्माण न होणाऱ्या रक्ताचे दान ते करून घेतात. त्यामुळे त्यांचे हातून मोठे समाज कार्य होत आहे. तसेच महेश निमोणकर शहरातील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. ते वेगवेगळे सामाजिक काम करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्याचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते व समाज घटकांशी सलोख्याचे संबंध आहेत.
यावेळी बोलताना जामखेड पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, समाजाला कशाची आवशकता आहे हे लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचा सुरू केलेला पायंडा अभिमानास्पद आहे.
त्यापासून इतरांनीही प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
यावेळी दत्तात्रय वारे, ॲड. अरूण जाधव, प्रा. कैलास माने आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा महासंग्राम युवा मंचचे अध्यक्ष महेश निमोणकर यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम महेश निमोणकर, मनोज वराट, अजय गौड, गणेश काळे, भिमराव मोहळकर, अजिनाथ राऊत, निलेश बिराजदार, अक्षय म्हेत्रे, विकास राऊत, भागवत म्हेत्रे, बबलू निमोणकर, सोमा निमोणकर, अतुल जगताप, बाबासाहेब निमोणकर, पांडू मोरे, रामदास राऊत. दादा निमोणकर, आण्णा काशिद, रवी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
शेवटी कार्यक्रमचे आयोजक महेश निमोणकर यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
