योगेश येवले व कल्पना येवले पती पत्नी मूलाखतीला आले वाजत गाजत प्रभाग क्रमांक ७ सह शहराचे वेधले लक्ष
योगेश येवले आणि कल्पना येवले पती पत्नी मूलाखतीला आले वाजत गाजत, प्रभाग क्रमांक ७ सह शहराचे वेधले लक्ष.
सामाजिक कार्याच्या बळावर प्रबळ दावेदार, तरुणांचा पाठिंबा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. भाजपतर्फे सोमवारी काही प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतल्या.
प्रभाग क्रमांक ७ मधुन इच्छुक उमेदवार योगेश सुधीर येवले आणि कल्पना योगेश येवले या पती पत्नीने मुलाखतीला वाजत गाजत मिरवणूकीद्वारे येत लक्ष वेधले. भव्य वाजतगाजत रॅलीने संपूर्ण जामखेड शहराचे लक्ष वेधून घेतले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रॅलीतील उत्साह, घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे वातावरण भारावून गेले होते.
भाजपकडून प्रभाग ७ मधुन उमेदवारी मिळावी यासाठी येवले दाम्पत्याने मोठे शक्तिप्रदर्शन करत मुलाखत दिली. सामाजिक कार्याच्या बळावर आणि प्रभागातील लोकसंपर्काच्या ते उमेदवारी मागत आहेत.
प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले योगेश येवले हे २००७ पासून आपल्या गणेश मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांनी तपनेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता. तसेच कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर किराणा किटचे वाटप करून, गरजूंना दिलासा दिला. त्यांच्या या कार्याची शहरभर चर्चा झाली होती.
प्रभागातील युवक आणि महिला वर्गामध्ये येवले दाम्पत्याला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. नगरसेवक म्हणून निवड झाल्यास “स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड” या संकल्पनेला मूर्त
स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही पती पत्नी प्रभाग क्रमांक ७ साठी इच्छुक उमेदवार म्हणून दोघांनी मुलाखती दिल्या आहेत मात्र दोघांपैकी एक जण नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहणार आहेत. असे यावेळी योगेश येवले यांनी सांगितले
error: Content is protected !!