मागच्या चुका पुन्हा नको ! जामखेड विकासासाठी भाजपाला बहुमत द्या :- सभापती प्रा राम शिंदे यांचे आवाहन
८ प्रभागात ७० जण इच्छुक – : संजय काशिद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराचा विकास वैयक्तिक विकास नाही. संपूर्ण शहराचा कायापालट करायचा आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केंद्रात राज्यात भाजपाचे सरकार आहे. मागच्या निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा नको तेव्हा जामखेड नगरपरिषदेवर पुर्ण बहुमताने भाजपची सत्ता आवश्यक आहे.
जनतेच्या आशीर्वादाने भाजपचा झेंडा नगरपरिषदेवर फडकेल असा विश्वास प्रा.शिंदे यांनी व्यक्त केला.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीदरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना प्रा.शिंदे म्हणाले की, मी कामापुरता मामा नाही. विरोधकांचेही फोन उचलतो. नाराजी नको, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे.उमेदवारीबाबत कठोर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, उमेदवारी देतांना गेल्या वेळी जी चूक झाली, ती यावेळी होणार नाही. कोणी कीतीही जवळचा असला तरी कोणत्याही शिफारशीवर तिकीट दिले जाणार नाही. लोकांच्या मनात असणाऱ्या, सर्व्हेमध्ये स्वीकारल्या गेलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी पक्षाने याबाबत काही पदाधिकारयांची जबाबदारी निश्चित केली आहे.
यावेळी भाजपा पक्षाचे जामखेड निवडणूक प्रभारी शेखर खरमरे, जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा प्रतिभा रेणुकर, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,सभापती पै.शरद कारले ,शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद,तालुका अध्यक्ष बापुराव ढवळे,प्रविण चोरडीया, मनोज कुलकर्णी,रविंद्र सुरवसे, ॲड.अजय काशिद,ॲड.प्रविण सानप, पिंटूशेठ बोरा,नगराध्यक्षपदाच्या इच्छुक सुनिता मधुकर राळेभात,प्रांजल चिंतामणी, रोहिणी काशिद,वैशाली झेंडे तसेच नगरसेवक पदाचे शेकडो इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते.
–—–७० इच्छुक उमेदवार – – –
यावेळी दि १० नोव्हेंबर रोजी जामखेड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३,४,११,१२,७,८,९,१० या एकुण ८ प्रभागातील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दोन सत्रात मूलाखती झाल्या. यामध्ये एकुण ७० इच्छुकांनी मूलाखतदि दिल्या अशी माहिती जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी दिली.


