एकनिष्ठता, दांडगा लोकसंपर्क व सामाजिक कामाच्या जोरावर अर्जुन म्हेत्रे यांची प्रभाग ९ मधुन सकारात्मक प्रतिसाद : जनतेचा एकमुखी पाठींबा
एकनिष्ठता, दांडगा लोकसंपर्क व सामाजिक कामामुळे अर्जुन म्हेत्रे यांची प्रभाग ९ मध्ये सकारात्मक चर्चा
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे समर्थक
जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम चालू झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकांशी सलोख्याचे संबंध असणारा लोकसंपर्कातला संयमी चेहरा म्हणून अर्जुन म्हेत्रे सर्वपरिचित आहेत. प्रभाग ९ मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार अर्जुन म्हेत्रे यांच्या नावाची सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांनी अर्जुन म्हेत्रे यांच्या उमेदवारीला एक मुखी पाठींबा जाहिर केला. यावेळी बैठकीत श्रीधर म्हेत्रे, बंडू म्हेत्रे, दीपचंद म्हेत्रे, संजय मेनकुदळे, अशोक म्हेत्रे, उत्तम म्हेत्रे, विश्वनाथ भोगे, आबासाहेब म्हेत्रे, विजय म्हेत्रे सर, माणिक म्हेत्रे, प्रल्हाद म्हेत्रे, आरिफ सय्यद, सुनील शिंदे, मिलिंद मोरे, शबीर कुरेशी, दीपक टेकाळे, विशाल अब्दुले, राजुभाऊ सदाफुले, शंकर बोराटे, राम शेंडकर, प्रकाश म्हेत्रे, चंदू म्हेत्रे, रमेश भोगे, यादव मेजर, कुंडलिक म्हेत्रे, सचिन घायतडक, करडकर नाना, गोकुळ म्हेत्रे, दीपक भोगे, वैभव म्हेत्रे, आदित्य रोकडे व समस्त वडाची वस्ती, अहिल्या वस्ती, फुलमळा, खडकवाडी, पोकळे वस्ती, काटकर वस्ती आदी प्रभागातील समस्त मोठ्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

अर्जुन म्हेत्रे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते आहेत.

अर्जुन म्हेत्रे एक सर्वसामान्य कुटुंबातील असुन आपल्या संयमी सुस्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. नगरसेवक पदासाठी जनतेचा पाठिंबा मिळत आहे. भाजपा पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी एकनिष्ठेचा विचार करून उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांमध होत आहे.