बापलेकाच्या आत्महत्येने खळबळ एकाच कापड दोरीने बापलेकाची आत्महत्या जामखेड शहरातील कोर्ट परिसरातील घटना
एकाच वेळी दोघा बापलेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जामखेड शहरातील नव्या कोर्टाच्या परिसरातील शेतामध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यावेळी वडील कानिफनाथ यांना मुलाने नविन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजुला असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहीले.
RELATED ARTICLES

कानिफ ज्ञानदेव पवार वय ४५ सचित कानिफ पवार वय १६ राहणार जामखेड असे मयत बापलेकांचे नाव आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील आरोळे वस्ती याठिकाणी मयत कानिफनाथ ज्ञानदेव पवार हा आपल्या कुटुंबासह रहात होता.२-३ दिवसांपुर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. याच दरम्यान शुक्रवार दि २ जानेवारी २०२६ रोजी रात्री कानिफनाथ यांचा मुलगा सचित कानिफनाथ पवार, वय १६ या बापलेकाचे घरगुती कारणावरून वाद झाल्याचे समजते.
त्यामुळे मुलगा सचित हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघुन गेला.यानंतर वडील कानिफनाथ पवार यांनी रात्री आजुबाजुला मुलाचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. यानंतर वडील पुन्हा पहाटेच्या सुमारास मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले.
त्यामुळे वडीलांना हा धक्का सहन झाला नसावा म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह खाली घेतला. यानंतर मुलाने ज्या मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच मॅटच्या कपड्याने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेची माहिती समजतात नगरसेवक महेश निमोणकर व संतोष गव्हाळे यांनी धाव घेतली.
घटनास्थळी सा. पो. उपनिरीक्षक शिवाजी कदम व पो. कॉ. सचिन देवडे हे देखील दाखल झाले. यानंतर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आली. यानंतर संजय कोठारी व दिपक भोरे यांनी आपल्या रुग्णवाहिका घेऊन मृतदेह जामखेड ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी दोघाना मृत घोषित केले. दोघा बापलेकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.आत्महत्या की घातपात याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करित आहेत.
