Homeव्हिडिओ बातम्याप्रभाग सात बिलाल के साथ : उच्चशिक्षित एकनिष्ठ तरूणाच्या उमेदवारीला जनतेचा कौल!
प्रभाग सात बिलाल के साथ : उच्चशिक्षित एकनिष्ठ तरूणाच्या उमेदवारीला जनतेचा कौल!
प्रभाग सात ‘बिलाल के साथ’ :
उच्चशिक्षित तरुणाच्या उमेदवारीला जनतेचा कौल!
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुक २०२५ चे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्व प्रभागांमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये “प्रभाग सात बिलाल के साथ” अशी चर्चा नागरिकांमध्ये सध्या रंगली आहे.
बिलाल रशीद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यूवा कार्यकर्ते व आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते आहेत. या प्रभागात उच्चशिक्षित आणि जनसेवेतील सक्रिय तरुण बिलाल शेख यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बिलाल शेख यांनी गेल्या काही वर्षांपासून जनतेत राहून प्रभाग क्रमांक ७ मध्ये (जूना प्रभाग क्रमांक ९) अनेक सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. जनतेच्या अडचणींना तत्परतेने हाताळणारा, स्वच्छ प्रतिमा असलेला आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा हा तरुण आता “आपला नगरसेवक” म्हणून ओळख मिळवत आहे.समाजातील प्रत्येक घटकाशी सलोख्याचे संबंध असणारा निर्व्यसनी तरूण म्हणून प्रभागात सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. आ रोहित पवार यांनी बिलाल शेख या एकनिष्ठ व प्रमाणिक कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!