Homeव्हिडिओ बातम्याप्रगणक व पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण, रायसीना इंटरनॅशनल स्कूल मध्ये नगरपरिषदेच्या वतीने आयोजन

प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण, रायसीना इंटरनॅशनल स्कूल मध्ये नगरपरिषदेच्या वतीने आयोजन

 प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण

रायसीना इन्टरनॅशनल स्कुल येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजन.

 अजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगर परिषदेच्या वतीने ‘जनगणना-२०२७ (HLO)’ च्या अनुषंगाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच रायसीना इंटरनॅशनल स्कूल, जमादारवाडी येथे उत्साहात पार पडले.
दि ३ मे ते ५ मे या दिवशीय प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज ऑफिसर अजय साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास नगर परिषदेचे अभियंता आमेर शेख आणि हर्षल ढवळे हे फील्ड ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करत आहेत.

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, “जनगणनेचे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. अचूक माहिती संकलन करण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे तांत्रिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेतून त्यांना सर्व तांत्रिक बारकावे समजावून सांगितले जात आहेत.”
या प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना जनगणना-२०२७ च्या कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जात असून, यामुळे कामात अचूकता आणि गती येईल. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रगणक आणि पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत.
हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आले असून, दुसरा टप्पा ६ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!