Homeव्हिडिओ बातम्या"पुढारी वड" चहावाल्याचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर: जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं...

“पुढारी वड” चहावाल्याचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर: जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण: डॉ. प्रदीप ढवळे यांचं यश जामखेडसाठी अभिमानास्पद

 

पुढारी वड” चहावाल्याचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर:

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण:

डॉ. प्रदीप ढवळे यांचं यश जामखेडसाठी अभिमानास्पद

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील असलेल्या प्रसिद्ध ‘पुढारी वड’ येथील ‘हॉटेल पुढारी वड ’चे संचालक प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचे चिरंजीव डॉ.प्रदीप प्रकाश ढवळे यांनी आपली एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं हे कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जामखेड शहरात आणि परिसरातील नागरिक कौतुक करत शुभेच्छा देत आहेत.
डॉ. प्रदीप यांचे बालपण अगदी सामान्य परिस्थितीत गेले. वडिलांचे वडाच्या झाडाखाली चहाचे आणि लहानसं हॉटेल सांभाळत त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. डॉ.प्रदीप यांनी देखील त्यांच्या कष्टाचे चीज करीत अत्यंत कठोर अभ्यास, शिस्त आणि धैर्य याच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळवला आणि अखेर एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
या यशानंतर जामखेडमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, राजकीय व प्रशासकीय व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक आणि मित्रमंडळींनी डॉ. प्रदीप यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अनेक जणांनी सामाजिक माध्यमांवरून शुभेच्छांचा वर्षाव करत, त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.
डॉ. प्रदीप यांचं यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण जामखेडसाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही.हे या यातुन शिध्द होत आहे.

जामखेडसारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करून मोठं यश मिळवणं हे नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉ. प्रदीप यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी सर्वांची शुभेच्छा घेतल्या असून, भविष्यात समाजासाठी चांगली सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!