Homeव्हिडिओ बातम्यापाळत ठेवून वृध्द महिलेचे चाळीस हजार लंपास.. नागरिकांनो सांंभाळून; महिला चोरांची...

पाळत ठेवून वृध्द महिलेचे चाळीस हजार लंपास.. नागरिकांनो सांंभाळून; महिला चोरांची टोळी सक्रिय पाळत ठेवून लूटमार वाढली..

 पाळत ठेवून वृध्द महिलेचे चाळीस हजार लंपास..

नागरिकांनो सांंभाळून; महिला चोरांची टोळी सक्रिय

पाळत ठेवून लूटमार वाढली..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका व शहरात गुन्हेगारी (Crime) नित्याची झाली आहे. चोरी, लूटमार, घरफोडी, आदी घटना वारंवार घडत आहेत. सीसीटीव्ही असूनही चोरीच्या घटना घडत आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जामखेड शहरातील सहकार बँक शेजारी खरेदी विक्री कॉम्प्लेक्स नेत्रदीप चष्माघर दुकानात भर दुपारी घडली.वृध्द महिला विमल भगवान तवटे यांनी स्टेट बँकेतुन काढलेले ४० हजार रुपये लंपास केले आहेत. जामखेड पोलीसांनी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत विमल भगवान तवटे ( रा. तपनेश्वर गल्ली जामखेड) यांनी भारतीय स्टेट बँक जामखेड शाखेतुन दि ६ एप्रिल रोजी आपले पेन्शनचे चाळीस हजार रुपये काढले.नंतर त्या आपला चष्मा दुरुस्त करण्यासाठी सहकारी बँकेच्या काँम्पलेक्स मध्ये गळगटे यांच्या दूकानात गेल्या होत्या. यावेळी तवटे या दुकानात गेल्यावर चष्मा दुरुस्तीचे पैसे देताना पैशाची पिशवी काउंटर ठेवली त्याच वेळी या दोन महिलांनी तवटे आजी चष्म्याचे पैसे देण्यासाठी पैसे काढले असताना या दोन महिलांनी काउंटरवरची पिशवी लंपास करत पळ काढला. त्याच वेळी दुकानदाराला तवटे आजी म्हणाल्या की माझी पिशवी गेली त्यावेळी दुकानदार त्यां दोन महिलांचा पाठलाग करण्यासाठी पळाले. मात्र त्या चोर महिला रस्त्यावर लावलेल्या पांढरी चार चाकी शिप्ट गाडीमध्ये बसून पसार झाल्या.

सदर घटनेनंतर नागरिकांनी सीसीटीव्ही टीव्ही तपासले असता सर्व घटना सीसीटीव्ही टीव्हीत कैद झाली आहे. ते फूटेच नागरिकांनी  पोलिसांना दिले आहेत. लवकरच पोलीस चोरांना कैद करतील अशी आशा आहे. जामखेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

———–

सावधगिरी बाळगावी

————

चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमधून उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरी होतांनाचे दृश्य पाहून व्यापारी व नागरिकांचे डोळे देखील विस्फारले आहेत. शहरात महिला चोरांची टोळी कार्यरत असल्याची बाब समोर आली असून बँकेत व्यवहार करताना वयस्कर व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे झाले आहे. शहर व उपनगरांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांचा छडा लावणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. दिवसाढवळ्या चोर्‍या होत असतील तर शहरात चोरट्यांचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याबरोबर दिवसाही पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे. पोलिसांनी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी चोरीच्या घटनांचा छडा लावावा.जामखेड मध्ये चोरीचे प्रकार वाढले असून चोरीच्या घटनांची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद होते,

मात्र चोरी उघडकीस येण्यास बराच अवधी लागतो. तर कधी गेलेली वस्तू मिळणे दुरापास्त होऊन जाते. अशावेळी पोलीस सीसीटीव्ही वैगरे किंवा तत्सम पुराव्यांचा आधार घेऊन चोरट्यांचा शोध घेतात. मात्र अनेकदा चोरटे. पोलिसांना सीसीटीव्हीला (CCTV) न जुमानता सर्रास चोरी करण्याचे धाडस करतात. आता जामखेड मध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय झाल्याचे चित्र एका घटनेवरून समोर आले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!