Homeव्हिडिओ बातम्यापाणी सोडण्याचे काँक/वालचे खड्डे अपघात करतील ;मग नगरपरिषद जागे होईल??

पाणी सोडण्याचे काँक/वालचे खड्डे अपघात करतील ;मग नगरपरिषद जागे होईल??

पाणी सोडण्याचे काँक /वाँलचे खड्डे अपघात करतील
मग नगरपरिषद जागे होईल??

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक गल्लीत तसेच रस्त्यावर जागोजागी पाणी चालू करण्यासाठी वाल /काँक बसविलेले आहे. मात्र हे काँक अनेक ठिकाणी रस्त्यावरच मध्यभागीच आलेले वाँल खड्डयात आहे. ते खड्डे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच पायी चालणारांना त्रासदायक ठरत आहेत. एखादा अपघात झाल्याशिवाय नगरपरिषद जागे होणार नाही का? शंकाच आहे.
पोलीस स्टेशन रोडवर जवळ अगदी यू टर्न जवळच मोठा खड्डा आहे. पाण्याचा वाँल त्यात आहे. प्रत्येक वाहनांना विशेष म्हणजे यू टर्न घेतल्याबरोबर वाहनांना या खड्याचा सामना करावा लागतो. गाडी धडकन आदळते. तसेच पायी चालणारांना कधी कधी खड्डा चुकवणे अवघड होते. अनेक वेळा नागरिक येता जाता या खड्डयांना चुकवून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पडता पडता सावरले आहेत.
नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागातील पाणी सोडणारे कर्मचारी तसेच नागरिक रोज शहरातील विविध भागात पाणी सोडण्याच्या वाँल /काँक च्या जागी असलेले खड्डे पहातात.व होणारा त्रास सहन करतात मात्र नगरपरिषद प्रशासनाला कोणीही सांगत नाही. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील अशा विविध ठिकाणी ठीकाणी वाँल शेजारी पडलेल्या खड्डयांचा शोध घ्यावा. तसेच त्या खड्डयांचा घेराव सिमेट वाळू टाकुन कमी करण्याची गरज आहे. एखाद्या अपघातानंतर कोण जवाबदार राहील. आगोदर संपूर्ण शहरातील रस्ते परिपूर्ण नाहीत. अनेक अडथळ्यांचा त्रास सहन करत नागरिक ये जा करत आहेत. त्यात पाणी सोडण्याचे काँक/ वाल ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ते नगरपरिषद प्रशासनाने तातडीने बूजवून घेण्याची गरज आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!