Homeव्हिडिओ बातम्यापाणी टंचाई मात्र प्रशासनाची उपाययोजनांमध्ये दिरंगाई , तालुक्यात फक्त ४ टँकर ७...

पाणी टंचाई मात्र प्रशासनाची उपाययोजनांमध्ये दिरंगाई , तालुक्यात फक्त ४ टँकर ७ बोअर अधिग्रहण.५००माणसांना एक टाकी ?? ,पाणी की चेष्टा ??

जामखेड तालुक्यात पाणी टंचाई :प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे उपाययोजनात दिरंगाई

४ टँकर सुरू, ७ बोअर-विहिरी अधिग्रहित.

५०० लोकांसाठी एक टाकी ??

पाणी की चेष्टा ??

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून पंचायत समिती कडे टँकर मागणीचे प्रस्ताव दिलेले आहेत .मात्र प्रशासन नेहमीप्रमाणे पाणी टंचाईवर मात करण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये दिरंगाई करत असल्याचे दिसते.मान्सून लांबल्याने व भूजल पातळी खालावल्याने जामखेड तालुक्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.

तालुक्यातील ५८ गावे व अनेक वाड्या -वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे . वारंवार मागणी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने टंचाई सदृश्य गाव वाडीची पाहणी करून तालुक्यात फक्त ४ शासकीय टँकर सुरू केले आहेत. तसेच खासगी ७ बोअर व विहिरी अधिग्रहित केल्या असल्याचे पंचायत समिती प्रशासनाने सांगितले . मागणी तसा पुरवठा नाही .म्हणजे ग्रामस्थांच्या त्रासाची कदर नाही .पाणी टंचाई प्रस्ताव आलेल्या गाव व वाडी वस्तीवर जाऊन पाहणी करत गरज काही ठिकाणी ट्रॅकर सुरू केले आहेत. तालुक्यातील नान्नज येथे तीन तर मुंगेवाडी नागोबाचीवाडी येथे एक पाणी टंचाईचा प्रस्ताव आलेल्या गाव व वाडीवर पंचायत समिती मार्फत जाऊन खरोखर टंचाई आहे का? जलजीवन काम कुठपर्यंत आले आहे काय अडचण आहे किरकोळ खर्च व दुरूस्ती असेल तर ते सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणे आवश्यक आहे . विहिर बोअर अधिग्रहणचा विचार व तेही होत नसेल तर टँकर सुरू करण्यास परवानगी देण्यात येणे गरजेचे आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाकडुन प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही .सध्या नान्नज येथे तीन तर मुंगेवाडी नागोबाचीवाडी येथे एक टँकर सुरू आहेत तर जवळके व खुरदैठण चे प्रस्ताव आले आहेत. तसे काही ठिकाणी प्रस्ताव असूनही तेथे गरज नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मोहा २, दिघोळ २, सावरगाव १, कुसडगाव सरदवाडी २ तर नायगाव सतेवाडी चा प्रस्ताव आलेला आहे. सध्या ट्रॅकर सातेफळ मधून भरले जातात.

आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  पत्र लिहून मागणी केली की, “जामखेडसाठी कुकडी डाव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडावे. २०१९ साली मंजूर झालेल्या २७जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्या नाहीत, त्याचा आढावा घ्यावा. टँकर मंजुरीची प्रक्रिया सुलभ करावी.

——

त्याच गावाला टँकर द्या

टँकर येतो पण ५०० लोकांसाठी १ टाकी. २ हंडे पाणी मिळते. आंघोळ, धुणे, जनावरांचे कसे भागवायचे? प्रशासन पाणी देत आहे की चेष्टा करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे .अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून दूसरया गावाला न देता त्याच गावाला ,वाडीला टँकरद्वारे द्या अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!