Homeव्हिडिओ बातम्यापरतीचा पाऊस थांबायचं नावच घेईना :जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस :पुरामुळे जांबवाडी,...

परतीचा पाऊस थांबायचं नावच घेईना :जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस :पुरामुळे जांबवाडी, मोहा, रत्नापुर, मुंजेवाडी – नान्नज सह अनेक ठिकाणी जाण्या येण्याचा रस्ता काही काळ बंद

परतीचा पाऊस थांबायचं नावच घेऊना

जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस :

पुरामुळे जांबवाडी, मोहा, रत्नापुर, नान्नज- मुंजेवाडी सह अनेक ठिकाणी रस्ते काही काळ बंद.

जामखेड प्रतिनिधी

परतीचा पाऊस थांबायचं नावच घेईना. शहरासह ग्रामीण भागात पावसाने दैना अवस्था केली आहे. नदी नाले छोटे मोठे ओढे ओसंडुन वाहत आहे. पुराच्या पाण्याने  रस्ता आढवला तसेच शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले.

जामखेड तालुक्यात दि १९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दूपारी २.३० वाजे नंतर ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.जामखेड मध्ये विंचरणा नदीवरील जूना दगडी पुल पाण्याखाली गेला.नागेश्वर मंदिर परिसरातली नदी तुडुंब भरून वाहिली. शिवाजीनगर, भूतवडा रोड, मोरे वस्ती परिसरात रस्त्यावर पाणी वाहिल्याने नागरिकांना जाणे येणे अवघड झाले.शहरासह गावागावांतील नद्या पुन्हा तुडुंब वाहुन लागल्या. शेतातील नाले भरून वाहू लागले. जांबवाडी, मोहा,रत्नापुर, मुंजेवाडी – नान्नज सह अनेक ठिकाणी जाण्या येण्याचा रस्ता पुराच्या पाण्यान आढवला होता त्यामुळे शालेय विद्यार्थी नागरिक काही तास दोन्ही बाजूला अडकून पडले होते एसटी बसेसला पावसामुळे वेळेवर जाणे शक्य झाले नाही.

अनेक महिला भगींनीनी दशहरा धूणे धुतलेले वाळता वाळता दूपारी पुर्ण ओले झाले. मोठी तारांबळ उडालेली दिसली. सध्या पावसाचा जोर वाढत असल्याने नद्यांच्या विसर्गात वाढ होत आहे. पूराच्या पाण्यात वाढ होत आहे. तेव्हा नदीकाठच्या सतर्कता बाळगण्याचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलाआहे.

मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.

मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे.जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे.

पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे.

भारतीय हवामान खात्याने दिनांक १९ ते २३ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,३५० क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४७६९ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा १,११५ क्युसेक, मुळा धरणातून १०,००० क्युसेक, घोड धरणातून ७००० क्युसेक, सीना धरणातून १,६२८ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ३५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!