तीन महिन्यांपासून फरार तीन आरोपी
पोलीसांच्या जाळ्यात.
नान्नज येथील साळवे हल्ला प्रकरण
जामखेड प्रतिनिधी
बहुचर्चित नान्नज येथे साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणातील फरार असलेले तीन आरोपी जामखेड पोलीसांनी काष्टी ता श्रीगोंदा येथुन पकडले.
दिनांक 24.08.2025 रोजी नान्नज ता. जामखेड येथे घडलेलल्या मारहाण घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे अभिजीत संपत साळचे वय 22 वर्ष धंदा शिक्षण रा. नान्नज ता. जामखंड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरील तारखेस चेळी व टिकाणी यातील आरोपीत मजकुर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात घातक हत्यारे घेवुन एकत्र येवून संगणमत करन प्रथम साईनाथ पान टपरी बाजारतळ नात्रज ता. नामखंड येथे येवून फित्यांदी व साक्षीदार यांना फिर्यादीच्या गाडीला गाडी अडवी लावली.
त्यांना गाडीच्या बाहेर काढून त्यांना म्हटले की. आमची दहशत संपवीत आहे काय तसंच गांव यंद करुन भाषणे करुन आमची दहशत संपवितो काय म्हणून फिर्यादी व सक्षीदार यांना घातक हत्यार यांनी वार करुन यातील यातील 1) सार्थक विजय सावळे 2) ओम चंद्रकांत गोरे 3) सोमनाथ काशीनाथ शिंगेटे सर्व रा. नान्नज ता. जामखेड हे घटने पासुन फरार होते.
सदर फिर्याद दिनांक 25/8/2025 रोजी सायंकाळी 16/29 वा जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा नोंद गु.र.नं. 481/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1).118(1),118(2),119(2),324(4),189(2),119(2),191(3).190.351(2).126 (2), सह शत्र अधि. सन 1959 घे फलम 4/25 सह अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे सुधारणा अधिनियम सन-2015 चे कलम 3(2) (V),3(2) (va) याप्रमाणे दाखल केली आहे.
सदर गुन्हयात यापुर्वी सहा आरोपी अटक केली होते उर्वरीत आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार होतं. आरोपीताना अटक करावी या करीता दलित संघटनांनी आंदोलन केली होती ओरोपीच्या शोध कामी DYSP प्रविण लोखंडे यांच्या मार्गदशांनाखाली कर्जत विभागतुन तीन पथक नेमलेली होती दिनांक 02/11/2025 रोजी DYSP प्रविण लोखंडे यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन जामखेड पोलीसांनी व उपविभाग कर्जत येथील पोलीसांनी काष्टी ता. श्रीगोंद येथे सापळा लाऊन दिनांक 02/11/2025 रोजी आरोपी नामे ।) सार्थक विजय सावळे 2) ओम चंद्रकांत गोरे (3) सांगनाथ काशीनाथ शिंगेटे सर्व रा. नात्रज ता. जामखेड यांना काष्टी परीसरात पाठलाग करुन पकडलं व अटक केली.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधिक्षक सो. अहिल्यानगर, वैभव कलवूमै सो.अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, प्रविण लोखंडे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत, यांचे मार्गदर्शनाखाली जामखंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई. किशोर गावडे पोसई कन्हेरे, पोहेकों गडकर, पोहेकों संजय लोखंडे, पोना. रविंद्र वाघ, पोकों गणेश काळाणे, पांकों देवीदास पळसे, पोकों कुलदीप घोळचे, पोकों प्रकाश जाधव, पोकों देवकाते. पांकों आकाश शंयाळे यांच्या पथकाने केली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
