सुशिक्षित, संयमी, नेतृत्व प्रा विकी घायतडक
प्रभाग ४ मधुन नगरसेवक निवडणूक लढवावी नागरिकांचा आग्रह

जामखेड प्रतिनिधीः
सुशिक्षित, लोकाभिमुख, संयमी असलेले प्रा विकी घायतडक यांनी
जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधुन नगरसेवकपदासाठी निवडणुक लढवावी असा प्रभागातील नागरिकांचा आग्रह होत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सुशिक्षित, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याची मागणी मतदारांमधून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्य विकी घायतडक हे सुशिक्षित असुन सामाजिक जाणीव असलेले सुजान व्यक्तिमत्व आहे. विकी घायतडक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडुन नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत.त्यांच्याबाबत प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठी सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन सामाज कार्यातही सतत सहभागी असतात. नागरिकांच्या विविध अडीअडचणी समजून घेतात व त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करतात तसेच प्रत्यक्ष तत्परतेने धावून ही जातात. कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांना स्वतः नागरिकांमध्ये जाऊन मास्क हँडवाँश देत हिम्मत धैर्य देण्याचे काम केले.
संयमी आणि लोकाभिमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवला आहे. आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य घायतडक यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणुकीला चुरस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांमध्ये प्रा विकी घायतडक यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालें आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!