Homeव्हिडिओ बातम्यातक्रार दखल न घेता आधिकारयांनी मतमोजणी रेटुन नेली, आयोगाने आधिकारयांची चौकशी व...

तक्रार दखल न घेता आधिकारयांनी मतमोजणी रेटुन नेली, आयोगाने आधिकारयांची चौकशी व कारवाईची पांडुरंग भोसले यांची मागणी

तक्रारीची दखल न घेता आधिकारयांनी मतमोजणी रेटुन नेली.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत ;
आधिकारयांची मनमानी
कारवाई करण्याची पांडुरंग भोसले यांची मागणी


जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूक मतमोजणीच्या झालेली तफावत मान्य नसून त्यावेळी आधिकारयांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. मतमोजणी रेटुन नेत निकाल जाहीर केला. याबाबत निवडणूक आयोगाने संबधित आधिकारयांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पांडुरंग भोसले यांनी केली आहे.
पांडूरंग भोसले हे प्रभाग क्रमांक तीन च्या अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती आहेत. जामखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीनचे केंद्र क्रमांक 2 चे मतदान मोजणी वेळी कंट्रोल युनिट नंबर मध्ये तफावत आढळून आली. याबाबत तक्रार करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाखल घेतली नाही. जामखेड नगर परिषदेच्या दि २ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक झाली होती त्यावेळी मतदानाच्या शेवटी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतपेटी सील करताना मतदानाचा हिशोब फार्म वर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर देण्यात आला होता. दि 21 डिसेंबर मतदान मोजणी झाली. त्यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील केंद्र क्रमांक दोन चे मतमोजणी दरम्यान मतमोजणी मशीनवर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत आढळून आल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेऊन मतदान मोजणी थांबवून चौकशी करण्याची मागणी केली यावेळी मोठा गोंधळ उडाला होता त्यानंतर अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग भोसले यांच्या प्रतिनिधींनी तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता मात्र त्याची दखल न घेता कुणाच्यातरी दबावाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता पुन्हा मतमोजणी करून निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका हि संशयास्पद असून मशीन मध्ये घोटाळा केला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!