Homeव्हिडिओ बातम्याकावेरी हाँटेल व मालक पुन्हा चर्चेत एकाच ठिकाणी सतत गुन्हेगारी घटना...

कावेरी हाँटेल व मालक पुन्हा चर्चेत एकाच ठिकाणी सतत गुन्हेगारी घटना ; नागरिकांमधुन उलट सुलट चर्चा जेवनाच्या बीलावरुन हाणामारी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल

कावेरी हाँटेल व मालक पुन्हा चर्चेत
एकाच ठिकाणी सतत गुन्हेगारी घटना ; नागरिकांमधुन उलट सुलट चर्चा

जेवनाच्या बीलावरुन हाणामारी
नऊजणांविरोधात गुन्हा दाखल

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील हॉटेल कावेरी सातत्याने वादग्रस्त ठरत आहे गुन्हेगारी घटना त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा घडत आहेत. नुकत्याच जेवणाच्या बीलावरुन हॉटेल न्यु कावेरी या चालकास टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करित गंभीर जखमी केले. तसेच हॉटेलची तोडफोड करून हॉटेलचे नुकसान केले.

या प्रकरणी एकुण नऊ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषेश म्हणजे काही दिवसापूर्वींच याच हॉटेलवर बाहेरील गुंडांनी गोळीबार करीत दहशद पसरवली होती. यामध्ये जख्मी झालेले हाँटेल मालकावर उपचार चालू आहेत.
अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी याच ठिकाणी असलेल्या हॉटेल न्यु कावेरी या ठिकाणी झालेल्या गोळीबारात फीर्यादीचा भाऊ रोहीत अनिल पवार हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच याच हॉटेलवर दुसर्‍या घटनेत नऊ जणांच्या टोळक्याने फीर्यादीस जेवणाच्या बीलावरुन कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले.

या प्रकरणी फिर्यादी सिध्देश पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चेतन साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चौघे रा. भुतवडा ता. जामखेड, शुभम साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) रा. गोडाऊन गल्ली, जामखेड व इतर चार जण अशा एकुण नऊ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की फीर्यादीचा भाऊ मोहित पवार याचे आरोपी ऋषिकेश विटकर, रा. भुतवडा याच्या सोबत जेवणाच्या बीलावरुन दि 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता वाद झाला होता. यानंतर ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चेतन साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) चौघे रा. भुतवडा ता. जामखेड, शुभम साळुंखे (पुर्ण नाव माहित नाही) रा. गोडाऊन गल्ली, जामखेड व इतर अनोळखी चार जण असे एकुण नऊ जण याच दिवशी रात्री नऊ वाजता हॉटेल कावेरी या ठिकाणी आले व जेवणाच्या बीलावरुन झालेल्या वादामुळे न्यु कावेरी हॉटेलच्या काचा फोडल्या, तसेच हॉटेल मधिल खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी फीर्यादी हा त्यांना अडवत आसताना रवी भगवान पवार याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फीर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच इतर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फीर्यादी सिध्देश पवार याच्या डोक्याला आठ टाके तर मनगटाला सहा टाके असे एकुण चौदा टाके पडले आहेत. त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला वरील एकुण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड मध्ये काही ठिकाणीच सातत्याने गुन्हेगारी का घटना घडतात याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रविण इंगळे हे करीत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!