डॉ सुप्रिया भोंडवे यांना अमेरिकेन काँलेजची फेलोशिप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चौडी येथील शिवाजी भोंडवे यांची कन्या डॉ सुप्रिया भोंडवे यांना अमेरिकन काँलेज आँफ सर्जन ची फेलोशिप मिळाली आहे.जामखेडमधील अनेकजण उत्तमोत्तम कामगिरी करून जामखेडचे नाव मोठ करत आहेत .डॉ सुप्रिया या भुमीकन्येच्या या कामगिरीमुळे जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे .डॉ सुप्रिया भोंडवे यांच्या कामाचा इतरांनी आदर्श घ्यावा असे एच यू गुगळे पतसंस्थेने चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांनी शुभेच्छा देतांना सांगितले .
डॉ सुप्रिया भोंडवे यांचे जेजे हाॅस्पिटलचे आणि सायन काँलेज ला एमबीबीएस चे शिक्षण झाले .सध्या जेजे हाॅस्पिटल मध्ये शल्य चिकित्सक विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत . अमेरिकन काँलेजने डॉ सुप्रिया यांच्या पाच वर्षांतील आपरेशन कामाचा आभ्यास केला .त्यांच्या अनूभव आणि आभ्यासाने प्रभावित होऊन फेलोशिप प्रदान केली आहे . अमेरिकन काँलेज आँफ सर्जन च्या होणारया विविध समारंभत डॉ सुप्रिया भोंडवे यांना प्रबोधन करण्याची संधी मिळाली आहे. डॉ सुप्रिया भोंडवे यांना अमेरिकन काँलेजची फेलोशिप मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे .