Homeव्हिडिओ बातम्याजामखेड येथे ईडीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहिर निषेध ं

जामखेड येथे ईडीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहिर निषेध ं

आ.रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर सूडबुद्धीन कारवाई :

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ रोहित  पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील वर्चस्व रोखण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन ED सारख्या मंत्रोमार्फत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई केली आहे. या अकसबुद्धीने राजकीय अकसातुन केलेल्या  कारवाईचा जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर  जाहीर निषेध करण्यात आला .याबाबत तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले .
यावेळी बोलतांना अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही पुर्णताकदीनिशी आ. रोहित  पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. असे मनोगत व्यक्त करताना सांगितले . यावेळी प्रा मधूकर राळेभात, रमेश आजबे, विकास राळेभात, अमोल राळेभात, मोहन पवार, सौ अंजलीताई ढेपे,अँड हर्षल डोके, प्रा राजेंद्र पवार, प्रा राहूल आहिरे ,दत्ता सोले, शहाजी राळेभात, राजेंद्र गोरे, उमर कूरेशी तुषार डोके ,बीलाल शेख , बाबासाहेब मगर, प्रमोद पोकळे, हरिभाऊ आजबे, वसीम सय्यद, अर्जुन नेटके, संभाजी राळेभात, दादा महाडिक ,काकासाहेब राळेभात, प्रकाश काळे, वैजनाथ पोले संजय डोके यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!