Homeव्हिडिओ बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम शालेय साहित्य वाटप, वक्तृत्व...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम शालेय साहित्य वाटप, वक्तृत्व स्पर्धा आयोजित डोणगाव येथे डीजे मुक्त जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

शालेय साहित्य वाटप, वक्तृत्व स्पर्धा आयोजित

डोणगाव येथे डीजे मुक्त जयंती
जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कामगार आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष खंडोजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजे मूक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती भारतातच नव्हे भारताच्या बाहेरही जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत असताना ग्रामीण भागामधील खेड्यापाड्यामध्येही जयंती साजरी होत असताना दिसत आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष खंडोजी मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ग्रामीण भागामधील तरुण वर्गामध्ये उतरवण्याचे काम खूप मोलाचे केल्याचे दिसून आले. यावेळी शालेय मुलामुलींमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विजेत्यांना विद्यार्थ्यांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव व यादव वस्ती शाळला संविधान भेट म्हणून दिले. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी हे संविधान आपल्या शाळेमधून घेऊन त्याचा अभ्यास करावा अशी संकल्पना सांगितली यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या पेन वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील बिभिषण यादव, सरपंच अमोल यादव, उपसरपंच अमोल यादव, ग्रामपंचायत सदस्य गायकवाड अभिमान, पोपटराव फुले, ठेकेदार सचिन डोंगरे, वैभव, युवा कार्यकर्ते माऊली साळवे , संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सातव, अजित यादव ग्रामपंचायत सदस्य, गणेश यादव, अवि यादव, सचिन गायकवाड, हनुमंत मोरे, सुदाम मोरे, मुन्ना मोरे, युवराज धनवे, माजी सरपंच नितीन वारे, लालासाहेब वारे, शिवाजी पंडागळे,किरण मोरे, वैभव यादव, यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!