Homeव्हिडिओ बातम्याजामखेडला अतिवृष्टीचा दूसरा बळी : दहा दिवस उपचारानंतर गौतम गोरेंच्या मृत्यूची घटना...

जामखेडला अतिवृष्टीचा दूसरा बळी : दहा दिवस उपचारानंतर गौतम गोरेंच्या मृत्यूची घटना दुर्दैवी ;

जामखेडला अतिवृष्टीचा दूसरा बळी :गौतम गोरेंच्या मृत्यूची घटना दुर्दैवी:
दहा दिवस उपचार; अखेर मृत्यू:


जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथील पारूबाई किसन गव्हाणे या वृध्द महिलेचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला होता. तर दि. २२सप्टेंबर रोजी सावरगाव येथे घर कोसळून तीन जण जखमी झाले होते. दुसर्या घटनेत सावरगाव येथील गौतम गोरे यांचया दहा उपचार नंतर अखेर मृत्यू झाला आहे.  गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०) यांच्या डोक्यावर व डोळ्यावर बीम पडला होता.त्यामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि. २१ रोजी गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले  रविवारी दि. २२ रोजी पहाटे साडेचार वाजता घर कोसळले यात स्वतः पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले होते. यातील गौतम गौरे यांना जास्त मार लागला होता.डोक्यावर बीम कोसळला होता ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवस ते नगर येथे उपचार घेत होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मोठ्या शोकाकुल वातावरणात सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गौतम गोरे यांची घरची परिस्थिती गरीब असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!