खर्डा येथे प्रेषित मुहम्मद पैंगबर जयंतीतुन सामाजिक सलोख्याची दर्शन:
महालिंग कोरे यांनी केला सर्व मौलानांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी
खर्डा शहरात प्रेषित मुहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गणपती विसर्जन व इद मिलाद जवळ जवळ आल्याने गणेश विसर्जनाला मोकळीक देऊ. गणपती विसर्जन झाल्यानंतर आपली इद मिलाद प्रेषित मुहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक दि ८ सप्टेंबरला काढू असा धार्मिक व सामाजिक सलोखा राखण्यासाठी समंजसपणाचा निर्णय खर्डा येथील मुस्लिम बांधवांनी घेतला होता.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत खर्डा शहरातील मस्जिद ट्रस्टी, मौलाना, शेरखान पठाण, शाहरुख शेख, रंभा आतार, तौफिक आतार, शाहिद मोमीन, खलील आतार, चांद कुरेशी, सलीम शेख, पप्पूभाई तसेच इतर मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.
या निर्णयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी कौतुक करत स्वागत केले.
त्यानिर्णयानूसार दि ८ सप्टेंबरला प्रेषित मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी मिरवणूक शांततेत पार पडली. गणपती उत्सवा दरम्यान ईद मिलाद ( महंमद पैगंबर जयंती) जयंती होती. मनाचा मोठेपणा दाखवून ही मिरवणूक गणपती विसर्जनाच्या नंतर काढण्यात आली. याबद्दल हिंदू बांधवांनी व पोलिस प्रशासनाने मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सामाजिक धार्मिक सालोख राखण्यासाठी कायम पुढे राहणारे ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी सर्व मौलाना यांचा सत्कार केला.
जयंतीच्या निमित्ताने आखाडा मस्जिद जवळ भव्य मंडपात उभारला होता. याठिकाणी खर्डा शहरासह परिसरातील मूस्लिम बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी मौलाना रिझवी म्हणाले की, प्रेषित मुहम्मद पैंगबर यांचे विचार समस्त समाजाला प्रेरणा आहेत. पाच वेळेचा नमाज ( प्रार्थना) सर्व मुस्लिम बांधवांनी करा आयुष्य सुखी बनवा, व्यसनाधिन होवू नका.तसेच सामाजिक एकतेचा मोलाचा संदेश मौलाना यांनी दिला.
यावेळी शिक्षण व खेळ विविध कलागुणांत प्राविण्य मिळविलेल्या मूलांक मुलींचा सत्कार व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितिन गोलेकर वि.वि.का.सह. संस्थेचे संचालक अरबाज जिकरे, सामाजिक कार्यकर्ते शेरखान पठाण, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शहारूख शेख,शाहीद मोमीन,आयुबभाई आतार,पप्पुभाई तांबोळी, मुस्लिम यूवक अध्यक्ष तोसीफ (बाबा) आतार ,सोनू शेख,फिरोज मोमीन,सोयब आतार,फारूख (पप्पू ) आतार, जिवनदिप कृषी संस्थेचे संचालक मजिद जिकरे,
मसाला विक्रेते इन्नुसभाई आतार, आयूबभाई बागवान, सदाम तांबोळी, शहाबाज सय्यद, खलील आतार आदींनी परिश्रम घेतले.खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनखाली
पोहेकाँ संभाजी शेंडे, पोकॉ. शशिकांत म्हस्के, पोकॉ बढे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
