बाफना कुटुंबीय सामाजिक कार्य कौतुकास्पद : सभापती प्रा राम शिंदे:
आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांचे आदर्श काम
जामखेड प्रतिनिधी
जामखेडमध्ये सामाजिक धार्मिक कार्यात बाफना कुटुंबीय नेहमीच अग्रेसर आहेत. बाफना कुटुंबीयांच्या कामात आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी मोठी भर घातली आहे.
शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवत आपला आदर्श निर्माण केला आहे. आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आदर्शवत काम सुरू आहे. असे मत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
जामखेड शहरातील गणेश मंडळाचे आदर्श फाउंडेशनच्यावतीने सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते आकाश बाफना यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील शिवराजे तरूण मंडळ काटकरवस्ती, शंभू राजे बाजारतळ, शिवशांती पोकळेवस्ती, वीरराजे बीड रोड, मार्केटचा सिद्धीविनायक, जय हनुमान तरूण मंडळ जाधव गल्ली, शिवसुर्यप्रतिष्ठान पोलीस स्टेशन रोड, जाणता राजा गृप, पोलीस स्टेशन रोड, धर्मज्योत संभाजीनगर, योध्दा गृप मोरे वस्ती, रामचंद्र तरूण मंडळ कुंभार गल्ली, संघर्ष मित्रमंडळ कोर्ट रोड, जगदंब प्रतिष्ठान मेनरोड, महासंग्राम युवा मंच लक्ष्मी चौक, सावता गृप बोराटे वस्ती यासह
अनेक मंडळांना भेटी देत आरती करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळाचे सत्कार आयोजित करण्यात आले होते.
या मंचावर सभापती शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाफना कुटुंबीय तसेच भाजपाचे शिवकुमार डोंगरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आकाश बाफना म्हणाले की जामखेड मध्ये पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपून सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला.
समाजाप्रति असलेले बांधिलकी याबद्दल सर्वांचे सन्मान करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने जामखेड मधील सर्व गणेश उत्सव मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे आदर्श फाउंडेशन तर्फे स्वागत करण्यात आले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
