Homeव्हिडिओ बातम्याकाश्मीर पहलगाम हल्ल्याचा जामखेड मध्ये निषेध

काश्मीर पहलगाम हल्ल्याचा जामखेड मध्ये निषेध

काश्मीर पहलगाम येथील दहशत वाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध

जामखेड प्रतिनिधी

 

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप लोकांवर दि 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदु समाजाच्या वतीने दि २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी शहरातील खर्डा चौक या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळुन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करण्यात आला.

यावेळी अजय काशिद, शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे, अमित चिंतामणी, पांडुराजे भोसले व प्रदीप टाफरे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप हिंदुवर दहशतवाद्यांनी हल्ला करुन गोळ्या घालून ठार मारले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदु आहात का? असे विचारुन अनेकांना ठार मारले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. कश्मीर मध्ये येऊन हल्ला करुन दहशतवाद्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आपल्याच भारतीय सैनिकांचा ड्रेसकोट घालून भारतात प्रवेश करुन दहशतवादी हल्ले करत आहेत यानां वेळीच आवर घालणे हि केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

पहलगाम मध्ये घडलेली घटना ही देशाला काळीमा फासणारी आहे. धर्म विचारुन गोळ्या घातल्या जात आहेत अशा घटना मानवतेला कलंक आहे. पुलवामा हल्लाला सर्जिकल स्ट्राईक ने उत्तर दिले तसेच उत्तर यावेळी देखील देणे गरजेचे आहे आणि हीच खरी हल्ल्यात मृत्यू झालेल्या बांधवाना श्रध्दांजली ठरेल. जम्मू आणि काश्मीर हा भाग भारताचा स्वर्ग मानला जातो आणि आसे दहशतवादी हल्ले वारंवार घडत राहीले तर याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही असे सांगितले. यानंतर आशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलुन दहशत वाद्यांचा बिमोड करवा जेने करुन आशा घटना घडणार नाहीत आशी मागणी करण्यात आली. या नंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी संजय काशिद, अमित चिंतामणी, अजय काशीद, महेश निमोणकर, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रदिप टापरे, पांडुराजे भोसले, अभिजित राळेभात, लक्ष्मण कानडे, दादासाहेब सरनौबत, बापुसाहेब कार्ले, सचिन देशमुख, अकाश पिंपळे, ऋषिकेश मोरे, सनी सदाफुले, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेत्रे, बंटी पाटील, शंभु भोसले ॲड घनशाम राळेभात गोपी देवा अनिल पाटील, आप्पा पंडीत, अक्षय खिळे, आकाश घागरे सह आदी उपस्थित होते.

*प्रतिनिधी यासीन शेख 9423391215* 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!