Homeव्हिडिओ बातम्याआता शहराच्या विकासाला गती देणार - मुख्याधिकारी अजय साळवे ,अजय साळवे यांची...

आता शहराच्या विकासाला गती देणार – मुख्याधिकारी अजय साळवे ,अजय साळवे यांची वर्ग १ श्रेणीत बढती .कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार

आता शहराच्या विकासाला गती देणार :-
मुख्याधिकारी अजय साळवे..

अजय साळवे यांची वर्ग-१ पदी बढती

मुख्याधिकारी म्हणून जामखेड नगरपरिषदेचा पुन्हा कार्यभार

कर्मचारी संघटनेकडून सत्कार, भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव

जामखेड प्रतिनिधी

शासनाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि नगरपरिषदेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न राहील.असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले.
जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची मुख्याधिकारी वर्ग-२ पदावरून मुख्याधिकारी वर्ग-१ पदावर बढती झाली आहे .त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते .
महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडे पुन्हा जामखेड नगरपरिषदेचा कार्यभार सोपविला आहे.
मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या पदोन्नतीबद्दल जामखेड नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

अजय साळवे यांनी जामखेड नगरपरिषदेत कार्यरत असताना विविध विकासकामे, प्रशासकीय सुधारणा तसेच नागरिकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवून आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे. त्यांच्या कामकाजाची दखल घेत शासनाने त्यांना मुख्याधिकारी वर्ग-१ पदावर पदोन्नती देत पुन्हा जामखेड नगरपरिषदेची जबाबदारी सोपविली आहे.

यावेळी आयोजित सत्कार समारंभात कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साळवे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले .आता नवीन उच्च श्रेणी मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय राखत विकासाभिमुख निर्णय घेण्याची त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे असे मनोगत व्यक्त करताना अनेकांनी सांगितले.
या प्रसंगी नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!