Homeव्हिडिओ बातम्याआठवडा बाजार चिखलात बसायला जागा नाही पण कर वसुली जोरात : ...

आठवडा बाजार चिखलात बसायला जागा नाही पण कर वसुली जोरात : घसगूंडी सर्व रस्त्यात : पायी चालावा की उडी मारावा कळेना. दोन्ही आमदार, गाव नेते बघ्यांच्या भुमिकेत: जामखेडची शहराची दयनीय अवस्था:

 

आठवडा बाजार चिखलात बसायला जागा नाही पण कर वसुली जोरात :

घसगूंडी सर्व रस्त्यात :
पायी चालावा की उडी मारावा कळेना.
दोन्ही आमदार, गाव नेते बघ्यांच्या भुमिकेत:

जामखेडची शहराची दयनीय अवस्था:

जामखेड प्रतिनिधी
गेल्या ३-४ दिवसांपासून जामखेडला कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस चालू असल्याने पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यातच शनिवार दिवस आठवडी बाजार असल्याने छोटे मोठे व्यापारी शेतकरी व बाजाराला येणारे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .जामखेडचा जनावरांचा आठवडी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजारासाठी राज्यभरातुन एवढ्या मोठ्या प्रमाणावर पशू व्यापारी तसेच भाजीपाला, भूसार व्यापारी खरेदी विक्रीसाठी येतात. एवढ्या मोठ्या शहरात भाजीपाला आठवडी बाजारासाठी कसलीही नियोजित जागा नाही.सर्व आडगळीची जागा आहे. कूठे आठवडाभर बाजारात बसणारे व्यापारी सर्व जागा अडकवून ठेवतात . त्यामुळे आठवड्यात एकदा बाजाराला येणारे जयहिंद, चौक, खर्डाचौक, तपनेश्वर रोड, भूतवडा रोड आदी ठिकाणी जागा मिळेल तेथे भाजीपाला घेऊन बसतात. त्यात पावसाने त्रेधातिरपीट केली भाजीपाला सोडून द्यावा की भरून न्यावा कळत नाही. सर्व रस्ते जाम होतात. पायी चालता येत नाही. त्यातच काही लोक चार चाकी वाहने घूसवतात व तासन्‌तास रस्ता जाम करतात. या गंभीर बाबींकडे नगरपरिषद प्रशासनाकडून कायम दूर्लक्ष होत आहे. बाजाराची कर वसूल मात्र जोरात करून घेतात. बसायचेसदाफुले वस्ती, फूलमळा, खंडोबा नगर, झोपडपट्टी, खडकवाडी, मिलिंदनगर, बस स्थानकासमोरील जिजाऊ नगर, पोकळे वस्ती, आदी भागातील रस्त्यावरून नागरिकांना पायी चालावे की उड्या माराव्या समजत नाही. अनेक ठिकाणी गल्लीबोळातील अंतर्गत रस्ते घसरगुंडी झाले आहेत.
मात्र आजच्या भाषेत सांगायचं झालं तर काय ते रस्ते.. काय ते खड्डे.. काय तो चिखल…. जामखेडला एकदम ओके…! असेच म्हणायला हवे.
नागरिकांची झालेली फजिती बाजारात चिखलामुळे उडालेली तारांबळ अशी अनेक फोटो आहेत ते दाखवायचे कोणाला सांगायच कोणाला कारण गेल्या पाच वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक आहेत अन् प्रशासक नागरिकांना आजपर्यंत पाहिले नाहीत. भावी नगरसेवक म्हणून घेणारांनी कधीही शहरातील मुलभूत सुविधा बाबत आंदोलन केले नाही. संबंधित प्रशासनाला कींवा आमदारांना प्रश्न विचारले नाही. सध्या नगरपरिषद निवडणुक लवकरच लागणार आहे. लवकरच नागरिकांना भेटायला नगरसेवक व इच्छुकांच्या रांगा लागणार आहेत. तेव्हा त्यांना काय ते रस्ते.. काय ते खड्डे.. काय तो चिखल.. याच भाषेत जाब विचारला पाहिजे.

प्रशासक नावालाच! 

—————————–

 नगरपरिषद पदाधिकारयांची मुदत संपली असल्याने गेल्या पाच वर्षापासून प्रशासक म्हणून प्रांताधिकारी काम पहात आहेत. मात्र नगरपरिषद मध्ये आजपर्यंत एकदाही प्रशासक आले नाहीत. शहरातील असुविधा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. मुख्याधिकारी अजय साळवे हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दूरच ऐकण्यासाठी पण कधीही उपलब्ध नसतात. प्रशासक सह्यासाठी नगरपरिषद कर्मचारयांना तहसील मध्ये बोलावून घेतात मात्र प्रशासकांशी संबंधित आपल्या समस्या नागरिकांनी सांगायला कूठे जायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

 

 

यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!