Homeव्हिडिओ बातम्याअजित पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर पुरुषांच्या यादीत :२२ जुलै...

अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर पुरुषांच्या यादीत :२२ जुलै रोजी दादांची जयंती शासकीय कार्यालय ,शाळा महाविद्यालयात होणार साजरी

अजितदादा पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत

२२ जुलै रोजी दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा – महाविद्यालयात साजरी होणार

जामखेड प्रतिनिधी

राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांची जयंती आता सर्व शासकीय कार्यालयात साजरी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश आता शासकीय स्तरावरील अधिकृत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे .
अजितदादांच्या महाराष्ट्राच्या विकासातील अभूतपूर्व योगदानाचा हा मोठा सन्मान मानला जात आहे. स्व. अजितदादा पवार यांची पहिली जयंती २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. २२ जुलै या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना दिली जाईल.

हा आदेश राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनाही बंधनकारक करण्यात आला आहे. तेथेही दादांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!