…अखेर तेच झाले !
योग्य कारवायांची धडकी भरली
अन्
तुकाराम मुंढे यांची बदली केली
आचार संहिता संपल्याने राज्य सरकारचा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका
▶ तुकाराम मुंढे यांच्या जागेवर डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नेमणूक
लोकमंथन प्रतिनिधी
जे तुकाराम मुंडेंना जमले ते इतरांना नाही जमले अन् नेमके हेच भ्रष्टाचारी आधिकारी, नेते व भ्रष्टाचाराचे सहकारी यांना नाही खपले .नियमांचे पालुपद दाखवत आणि जनसामान्यांच्या जीवनाचा मरणाच्या आड येणारी भेसळीला प्रतिबंधक करणारया चांगल्या आधिकारयाची बदली केली.
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळी विरोधात कठोर मोहिम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने महत्वाच्या पदावरुन उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्वाच्या पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुरुवातीस आयुक्तपदी हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे नाखूश होते. मात्र, राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची
विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरु केली आहे.
मुंढे यांनी गेल्या पंधरा-वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबविली. कारवाईदरम्यान अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेलवरही मुंढे यांनी कारवाई करत आपल्या कामाची चूनूक दाखविली आहे.
तुकाराम मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असताना राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्याच्या साह्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते.
तुकाराम मुंडेंना जमले ते इतरांना नाही जमले नेमके हेच भ्रष्टाचारी आधिकारी, नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नाही खपले . शेवटी सत्तेपुढे शहाणपण नाही .सत्तेला पाहिजे तसे करून घेतात पण अशा निर्णयाने जनसामान्यांच्या जीवनावर कोणता परिणाम होतो याचा नेतेमंडळी खरच कधी विचार करतात ??

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
