Homeव्हिडिओ बातम्याधाकट्याच्या निधनाचे वृत्त कळताच थोरल्यानेही घेतला जगाचा निरोप, दोन सख्ख्या भावांचा एकाच...

धाकट्याच्या निधनाचे वृत्त कळताच थोरल्यानेही घेतला जगाचा निरोप, दोन सख्ख्या भावांचा एकाच चितेवर अंत्यसंस्कार बंधू प्रेमाचं ऱ्हादय पिळवटणारं उदाहरण

धाकट्याच्या निधनाचे वृत्त कळताच थोरल्यानेही घेतला जगाचा निरोप, दोन सख्ख्या भावांचा एकाच चितेवर अंत्यसंस्कार

बंधू प्रेमाचं ऱ्हादय पिळवटणार उदाहरण

जामखेड प्रतिनिधी

धाकट्या भावाचे दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच काही वेळातच थोरल्या भावानेही अखेरचा श्वास घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथे शनिवार दि २९ आँगस्ट रोजी दुपारी घडली.
दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. विशेष म्हणजे दोन्ही भावांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय ९०) आणि माणिकराव निवृत्ती राठोडकर (वय ८५) अशी मयत झालेल्या भावांची नावे आहेत. भाऊराव राठोडकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांच्या घरी जमा झाले होते.

मोठ्या भावाची गंभीर अवस्था पाहून धाकटे भाऊ माणिकराव यांना अश्रू अनावर झाले. भावाच्या प्रकृतीची चिंता आणि दुःखाच्या आवेगात त्यांना अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी वाहनातून रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच माणिकराव यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, घरी असलेल्या मोठ्या भावाने भाऊराव राठोडकर यांनीही त्याच सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे काही क्षणांच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने राठोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने केळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थही हळहळले.

नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये दोन्ही भावांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या बंधू प्रेमाची चर्चा सुरू झाली .एकमेकांमध्ये असलेल्या जिव्हाळ्यामुळे दोन्ही भावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार एकाच सरणावर करण्याचे ठरले योगायोग समजावा असे शनिवारी दुपारी १ वाजता केळगाव येथे शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर दोन्ही भावांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव राठोडकर यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. तर माणिकराव राठोडकर यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.
ही घटना शिकवते की कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना असली की नाते नेहमी जिवंत राहते.आज प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल जास्त विचार करतो, पण जे लोक इतरांचे सुख-दुःख समजून घेतात, त्यांचे आपापसातील संबंध मजबूत होतात.

जेव्हा तुम्ही इतरांसाठी विचार करता, तेव्हा तुम्हाला त्या बदल्यात आदर आणि प्रेम मिळते.जेव्हा आपण आपल्या वाट्यातून थोडे सोडतो, तेव्हा आपल्या नात्यांमध्ये खोली येते. त्याग कधीही नुकसान करत नाही, उलट तो मनांना जोडतो. म्हणून नात्यांमध्ये त्यागाची भावना असायला हवी.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!