Homeव्हिडिओ बातम्यातिरट पत्यांचा खेळ रंगला अन् पोलीसांनी वेळ साधला मोबाईल...

तिरट पत्यांचा खेळ रंगला अन् पोलीसांनी वेळ साधला मोबाईल ,रोख रकमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ओम साई हाँटेल चर्चेत

 

तिरट पत्यांचा खेळ रंगला अन् पोलीसांनी वेळ साधला

मोबाईल ,रोख रकमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ओम साई हाँटेल चर्चेत

जामखेड प्रतिनिधी

अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या अनुषंगाने खर्डा पोलिस पथक गस्त करत असतांना लोणी फाट्यावरील हाँटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये तिरट पत्यांचा चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह तीन मोबाईल, जुगाराचे पत्ते असा एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुक्रवारी दि. २८ आँगस्ट रोजी रात्री १०.३० वाजे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. अरुण राजेंद्र गांगुर्डे यांना लोणी फाटा येथे हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बाबु केकाण हा इसम विनापरवाना पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. रात्री सुमारे १०.४५ वाजता पोलिस पथक तेथे पोहोचले असता शेडमध्ये काही इसम गोलाकार बसून पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

१) बाबु अर्जुन केकाण (वय २८, रा. दरडवाडी)

२) राहुल राजेंद्र पवार (२७, रा. बांदखडक)
३) तानाजी खंडेराव पुंदे (४५, रा. बांदखडक)
४) अनिल वैजीनाथ दराडे (३०, रा. दरडवाडी)
५) गणेश लक्ष्मण गिते (२३, रा. गीतेवस्ती, आनंदवाडी)
६) भरत अंकुश गिते (३४, रा. आनंदवाडी) या सहाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या झडतीत बाबु केकाण याच्याकडे तीन पत्ते व २२०० रुपये रोख, राहुल पवार याच्याकडे तीन पत्ते व ९०० रुपये रोख मिळाले. तानाजी पुंदे याच्याकडे तीन पत्ते, ११०० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, तर अनिल दराडे याच्याकडे तीन पत्ते, ९५० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला.गणेश गिते याच्याकडून तीन पत्ते, ७६० रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा कीपॅड मोबाईल, तर भरत गिते याच्याकडून तीन पत्ते व १२०० रुपये रोख मिळाली. याशिवाय जुगाराच्या डावातील १५०० रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली.

अशाप्रकारे रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश जबाजी कर्डिले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब दशरथ नगरगोजे करीत आहेत.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!