Homeव्हिडिओ बातम्यामहाराष्ट्र गोसेवा अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची दुसऱ्यांदा निवड .जामखेड जेष्ठ नागरिक संघाच्या...
महाराष्ट्र गोसेवा अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची दुसऱ्यांदा निवड .जामखेड जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार
महाराष्ट्र गोसेवा अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची दुसऱ्यांदा निवड
जामखेड जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार
जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी श्री. शेखरजी मुंदडा यांची पुनश्च निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जामखेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. तुकाराम अंदुरे व नान्नज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बळीराम मेहेर यांनी श्री. मुंदडा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. शेखजी मुंदडा यांनी गोसेवा आयोगाची माहिती दिली. महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय २८ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आला.
महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम, २०२३ हा २७ एप्रिल २०२३ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. आयोगाची राज्यात अंमलबजावणी १० मे २०२३ रोजी झाली, तर आयोगाचे प्रत्यक्ष कार्यान्वयन ७ जुलै २०२३ पासून सुरू झाले. आयोगाचे मुख्यालय पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीत, औंध, पुणे येथे आहे.
स्थापनेपासून आयोगाने राज्यातील गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांशी समन्वय साधणे, त्यांची नोंदणी व पर्यवेक्षण, गोवंशाचे संरक्षण-संवर्धन आणि कल्याण, देशी जातींचे संवर्धन, पशू आरोग्य सेवा, चारा विकास तसेच दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंच्या देखभालीसाठी आवश्यक व्यवस्था यावर भर दिला आहे.
अस्तित्वातील कायद्यांचे उल्लंघन करून जप्त करण्यात आलेल्या पशुंची काळजी व
व्यवस्थापन सुनिश्चित करणे, शेतकरी व संबंधित घटकांसाठी पशुव्यवस्थापना बाबत जनजागृती व प्रशिक्षण देणे आणि महाराष्ट्राच्या गोवंश प्रजनन धोरणाची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे ही आयोगाची महत्त्वाची कार्ये आहेत.
गोशाळांना अधिक स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शन, गोमय-गोमूत्रा पासून मूल्यवर्धित उत्पादने, गो आधारित शेती आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रसार यासारख्या उपक्रमांनाही आयोगाने चालना दिली आहे.
त्यामुळे गोसेवा व गोसंवर्धन क्षेत्राला संघटित दिशा देण्याच्या दृष्टीने आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील व राहुलजी जगताप उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!