Homeव्हिडिओ बातम्याभाड्याच्या दूकानावरून हाणामारी .चारचाकी वाहनाची तोडफोड ;घरात घुसून मारहाण .आठ जणांविरोधात गुन्हा...
भाड्याच्या दूकानावरून हाणामारी .चारचाकी वाहनाची तोडफोड ;घरात घुसून मारहाण .आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
भाड्याच्या दूकानावरून हाणामारी
चारचाकी वाहनाची तोडफोड ;घरात घुसून मारहाण
आठजणांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे भाड्याने घेतलेल्या दुकानाच्या खाली करण्याच्या वादातून हाणामारीची गंभीर घटना घडली .या हाणामारीत कोयता, विटा ,दगडांचा वापर करण्यात आला आहे .याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
. याप्रकरणी फिर्यादी समीर तैनुर खान (वय 38, व्यवसाय: मार्केटिंग, रा.
सदाफुले वस्ती) यांच्या फिर्यादीनुसार आरोपींनी भाडेपट्टीविरोधी दबावामुळे आधी त्यांच्या चारचाकी वाहनावर खर्डा रोडवरील कॅफेनाज हॉटेलसमोर अज्ञात पांढऱ्या चारचाकीतून आलेल्या व्यक्तींनी कोयता व तलवारीने हल्ला करून वाहनाचे नुकसान केले.
यानंतर आरोपी चारचाकी व मोटारसायकलने समीर यांच्या घरापर्यंत पाठलाग करत आले व घरात घुसले आणि दगड, विटा व कोयत्याने समीर, त्यांच्या आई झकिया खान व वडील तैनूर खान यांना मारहाण करून गंभीर जखम करण्यात आल्या. समीर यांच्या पाठीवर कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. झकिया यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांची गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची गंठण हकीम आत्तार यांद्वारे जबरदस्तीने काढून नेली गेली, असे फिर्यादीत नमूद आहे.
शेजारी अलीशान जांगीर खान, यांना मारहाण करून गंभीर जखम करण्यात आल्या. समीर यांच्या पाठीवर कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. झकिया यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांची गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची गंठण हकीम आत्तार यांद्वारे जबरदस्तीने काढून नेली गेली, असे फिर्यादीत नमूद आहे. शेजारी अलीशान जांहागीर खान, फिरोज इस्माईल खान व वसीम नजिर खान यांनी हस्तक्षेप करून कुटुंबाला वाचवले; त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत आणि जीवघेणी धमक्या देत तेथून निघून गेल्याचे समीर यांनी फिर्यादमध्ये सांगितले. जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .
या मारहाण घटनेनंतर समीर तैनुर खान यांच्या फिर्यादीवरून
जामखेड पोलीस ठाण्यात मुजफर गनी आत्तार, हकीम आत्तार, अकीब (उर्फ पिल्या) आत्तार, साद आत्तार, आदर्श आत्तार, सोहेल जावेद आत्तार, आसिफ आत्तार व जईद जावेद आत्तार (सर्व रा. जामखेड) यांच्या विरोधात घरात घुसून मारहाण, वाहनाची तोडफोड, दागिने हिसकावणे आणि जीवघेणी धमक्या सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. संजय लोखंडे करत आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!