अबब पोलीस स्टेशनसमोरच चोरट्यांचे धाडस ;महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावले
कायद्याची पोलीसांची भीती नाही ??
महिलांनीहजा दागिने घातल्यावर खबरदारी घ्यावी :- रोहिणी काशीद

जामखेड प्रतिनिधी
भुरट्या चोरांचा सुळसुळाट अधून मधून डोके वर काढतच आहे. विशेष म्हणजे दि २३ जानेवारी रोजी सायंकाळी जामखेड शहरातील पोलीस स्टेशनच्या समोरच चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे धाडस केले आहे.
एक महिला आपल्या स्कुटीवरून घराकडे जात होती पोलीस स्टेशनसमोर आले असता पाठीमागून दुचाकीवरून वेगाने आलेल्या दोन इसमांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मिनी गंठण व दागिने हिसकावण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यातील एका इसमाने महिलेच्या स्कुटीचा हँडल ओढून गाडी वळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र सदर महिला अत्यंत सतर्क असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत कोपराने एका चोराच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे चोरांची दुचाकी असंतुलित झाली. चोरांनी गाडी महिलेच्या अंगावर सोडून देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात महिला खाली पडून हाताला दुखापत झाली, परंतु त्यांच्या खांद्यावर पदर घट्ट बांधलेला असल्यामुळे गळ्यातील दागिने चोरांच्या हाती लागले नाहीत.
विशेष म्हणजे ही घटना घडली जामखेड पोलीस स्टेशनसमोरच घडली आहे. पोलीस स्टेशनसमोरच इतक्या धाडसाने कृत्य करण्यास चोरटे धजावले, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, याच दिवशी दुसरी घटना सारोळा रोड परिसरात सायंकाळी ४.४५ वाजता सुमारास घडल्याची माहिती समोर आली असून अवघ्या एका तासाच्या अंतराने शहरात दोन साखळी चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.सध्या संक्रांतीनंतर हळदी-कुंकवाचे दिवस सुरू असून, महिलांची वर्दळ वाढलेली आहे. याचाच गैरफायदा घेत साखळी चोर सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
————–
महिलांनीही दागिने घातल्यावर खबरदारी घ्यावी – रोहीणी काशीद
———————————
पोलीस स्टेशनसमोरच महिलांवर साखळी चोरीचा धाडसी प्रयत्न होणे हे अत्यंत धक्कादायक व संतापजनक आहे. ही घटना केवळ एका महिलेवरील हल्ला नसून संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेवरचा घाला आहे.
साखळी चोरीचे वाढते प्रकार चिंताजनक असून पोलीस यंत्रणा सतर्क होणे गरजेचे आहे,महिलांची सुरक्षितता ही मागणी नाही, हक्क आहे.महिलांची सुरक्षितता हक्काची जबाबदारी आहे.महिलांनीच स्वतःचे रक्षण करावे, संक्रांतीनंतरच्या हळदी-कुंकवाच्या काळात साखळीचोर सक्रिय झाले असून पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी. महिलांनी दागिने घालून जाताना खबरदारी घ्यावी असे महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशीद यांनी सांगितले.

पत्रकार यासीन शेख 9423391215
