तक्रार दखल न घेता आधिकारयांनी मतमोजणी रेटुन नेली, आयोगाने आधिकारयांची चौकशी व कारवाईची पांडुरंग भोसले यांची मागणी
प्रभाग क्रमांक ३ मध्ये कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत ;
RELATED ARTICLES


दि 21 डिसेंबर मतदान मोजणी झाली. त्यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील केंद्र क्रमांक दोन चे मतमोजणी दरम्यान मतमोजणी मशीनवर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत आढळून आल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेऊन मतदान मोजणी थांबवून चौकशी करण्याची मागणी केली यावेळी मोठा गोंधळ उडाला होता त्यानंतर अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग भोसले यांच्या प्रतिनिधींनी तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता मात्र त्याची दखल न घेता कुणाच्यातरी दबावाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता पुन्हा मतमोजणी करून निर्णय जाहीर केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका हि संशयास्पद असून मशीन मध्ये घोटाळा केला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215