माजी नगराध्यक्षा अर्चना राळेभात यांची न्यायालयात धाव
उमेदवारी अर्ज अवैध्य कसा??
अर्ज वैध्य ठरवावा:
राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधातही उच्च न्यायालयात याचिका दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात यांनी अवैद्य ठरविलेल्या उमेदवारीला वैद्य करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मधुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि १८ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने उशीरा एक नवीन नियमाचा जीआर काढला त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्चना राळेभात यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला मात्र अर्चना राळेभात यांनी आधिकारयांनी दिलेल्या निर्णयावर अक्षेप घेतला.
अर्ज माघारी न घेता उमेदवारी अर्ज वैध्य ठरविण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. सदर प्रकरणी न्यायालयाने नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. त्यावर दि २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यास सांगितले आहे.
तसेच २५ तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत दिली आहे.
जामखेडकरांच्या नजरा २४ तारखेच्या सुनावणी कडे लागल्या आहेत. तसेच राज्याच्या निवडणुक आयोगाने दि १८ नोव्हेंबर रोजी उशीरा काढलेल्या जीआर विरोधात देखील अर्चना सोमनाथ राळेभात यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
—————-
पक्षाशी एकनिष्ठ, प्रणाणिक, लोकाभिमुख असलेले सोमनाथ राळेभात यांच्या सौभाग्यवती अर्चना राळेभात यांचा उमेदवारी अर्ज अवैध्य ठरविण्यामागे सोईचे राजकारण करण्याचा राजकीय डाव आहे का ?
नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी दबावात आहेत का?? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

