Homeव्हिडिओ बातम्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारीबाबत आम आदमी पार्टीचे अल्पसंख्याकांना प्राधान्य - अँड...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारीबाबत आम आदमी पार्टीचे अल्पसंख्याकांना प्राधान्य – अँड बिपीन वारे : आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार :- संतोष नवलाखा :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारीबाबत
आम आदमी पार्टीचे अल्पसंख्याकांना प्राधान्य – अँड बिपीन वारे
आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार – तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा
नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा बिगूल वाजला तसे सर्व कामाला लागले. आम आदमी पार्टी सबळावर निवडणूक लढणार आहे तसेच प्रस्थापित पक्षांच्या आगोदर
आम आदमी पार्टीने नगराध्यक्षपद पदाचा उमेदवार जाहीर केला. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील, जिल्हाध्यक्ष राजु आघाव यांच्या शिफारसनुसार तालूकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी रहिमुन्नीसा कमाल शेख यांना जाहीर केली आहे.

आतापर्यंत प्रस्थापित पक्षांनी अल्पसंख्याक समाजाचे फक्त मते घेतली आणि सत्ता भोगली मात्र आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या संकल्पनेनुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अल्पसंख्याक घटकातील लोकांना उमेदवारी बाबत प्राधान्य देण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी आठरापगड जातींना बरोबर घेणार आहे. असे जिल्हा मिडिया प्रमुख अँड बिपीन वारे यांनी सांगितले.
जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या अनुसंगाने आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अँड वारे बोलत होते. यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी सांगितले की आम आदमी पार्टी ही सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारी पार्टी आहे. सर्वसामन्य लोकांच्या मुलभूत गरजा व नगरपरिषद हद्दीतील लोकांना मुलभूत नागरी सुविधा व रोजच्या जीवनातील समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष राजु आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली
जामखेड शहर व नगरपरिषद हद्दीतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधला आहे.नगरसेवक पदाचे उमेदवारी बाबत चाचपणी चालू आहे.चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक इच्छूक आमच्या संपर्कात आहेत.
यावेळी जिल्हा संघटनमंत्री बजरंग सरडे यांनी आम आदमी पक्षाचे ध्येयधोरणे व निवडणुक रणनीतीतीबाबत मार्गदर्शन करत
जामखेड मधील मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, जिल्हा संघटक बजरंग सरडे, जिल्हा मिडियाप्रमुख अँड बिपीन वारे, शहराध्यक्ष अजय भोसले, उपाध्यक्ष दिपक शेळके, अतुल खराडे, अँड नदिम शेख, अँड अरबाज सय्यद, अँड जे एम सय्यद, सलिमभाई शेख, अँड नाजीम पठाण, गोकुळ परदेशी, सूंदर परदेशी, जूबेर काझी, स्वप्निल वारे, विकास पवार, अब्दूल शेख, नाजीम पठाण, अरफात शेख, ऋषी लांडगे सकलेन पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!