Homeव्हिडिओ बातम्याआदर्श फाऊंडेशनने जामखेड व परिसर केला प्रकाशमय :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाश बाफना...

आदर्श फाऊंडेशनने जामखेड व परिसर केला प्रकाशमय :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाश बाफना व पायल बाफना यांनी बसविले एल ईडी दिवे:

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठीकाणी एलईडी दिवे बसवले.

आदर्श फाउंडेशनने केले जामखेड शहर व परिसर प्रकाशमय

 

अकाशभाऊ व पायलताईंनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुर केला अंधार

जामखेड प्रतिनिधी

 

प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सर्वत्र साजरा होणार सण आहे. दिवाळी म्हणजे दिप उत्सव आहे. दिव्यांना प्रज्वलित करून आंधार दुर केला जातो आणि याच निमित्ताने आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश भाऊ बाफना व पायलताई बाफना यांनी जामखेड शहर व नगरपरिषद हद्दीतील गावांमध्ये पाहाणी करून ज्या ठिकाणी गरज आहे व नागरिकांच्या मागणीवरून हजारो एल ए डी लाईट बसवले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाचा आंधार दुर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच आणखी लाईट बसविण्याचे काम सुरू आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी गरज आहे. तेथील नागरिकांनी संपर्क करावा असे अवाहन आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी नागरिकांना केले आहे. नगरपरिषद क्षेत्रातील अनेक ठिकाणी पहाणी केली असता अनेक समस्या जाणवल्या तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पुल वाहुन गेले आहेत. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत मात्र प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने आम्ही अनेक ठिकाणी मुरूम टाकला तसेच पुल दुरुस्तीचे काम केले आहे. आता पुढच्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. अनेक ठिकाणी अंधार जाणवला दिवाळी सण साजरा करताना या अंधारामुळे नागरिकांची निराश होते आणि यामुळे आम्ही आमच्या आदर्श फौंडेशनच्या माध्यमातून वाडी वस्ती व शहरातील ठीक ठिकाणी एल ए डी लाईट बसवले आहेत. त्यामुळे नक्कीच दिवाळी सणात नागरिकांची दिवाळी प्रकाशमय करण्याचे काम करता आले. असे आकाश बाफना यांनी बोलताना सांगितले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!