रात्रभर जामखेड तालुक्यात मुसळधार पाऊस
दिघोळ मध्ये अनेक जण रात्रभर जागे. सोनेगाव सातेफळ धनेगाव पांढरेवाडी शेळगाव सतर्कतेचा इशारा

जामखेड तालुक्यात झोडपले
शहरात मध्यम तर ग्रामीण भागात जोरदार
अनेकांच्या घरात पाणी
शेतीपिकांचे अतोनात नुकसान
जामखेड प्रतिनिधी

रविवार रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जामखेड शहरासह तालुक्याला जोरदार पाऊसाने झोडपून काढले. भुतवडा–लेहनेवाडी पूल वाहून गेला;कॅनल फुटून शेत पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नदिच्या पुराच्या पाण्यात रात्रभर वाढ होत आहे. भूतवडा रस्ता परिसरात रस्त्यावरील पाणी घरात काही भागात घरात पाणी शिरले.
खर्डा भागात पावसाने अक्षरश: हाहाकार केला. खर्डा परिसर तसेच बालाघाटात आभाळ फाटलं की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावांमधील नागरिकांनी संपुर्ण रात्र भीतीच्या सावटाखाली जागुन काढली. 
दिघोळमध्ये पावासाचा कहर
दिघोळ मध्ये ढगफुटी झाली. रात्रभर दिघोळमध्ये पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली आहे. गावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. सावता दगडे यांच्या घराला पाण्याचा वेढा पडला आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे. त्याचबरोबर मांजरा नदीला मोठा पुर आल्याने नदी पात्र सोडून वाहत आहे. दिघोळमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रात्रीपासून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जागे आहेत. संपूर्ण गाव जागे आहे.
खर्डा येथे कौतुका नदीला मोठा पुर आला आहे. त्याचबरोबर गोलेकर लवण याठिकाणी ओढ्याला पुर आल्याने वाहतुक बंद झाली आहे.
तर दुसरीकडे खैरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडला आहे. यामुळे नदीला महापुर आला आहे. पहाटे ४ वाजता बांधखडक येथील पुल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाच फुट पाणी वाहत असल्याचे समजते आहे. खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तुफान पावसामुळे खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होऊ लागले आहे. दरडवाडी येथील पुलाचा कठला जोरदार पुरामुळे तुटला आहे.

त्यामुळे धरणाच्या विसर्गात वाढ झाली आहे. नदीकाठावरील वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव तालुका जामखेड व चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी, शेळगाव या गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती खर्डा सिंचन शाखेचे गणेश काळे यांनी दिली.

खैरी मध्यम प्रकल्प ता. जामखेड सकाळी. ०४.३० वा. दिनांक. २२/०९/२०२५ पाणी पातळी. ५६२.७५ मिटर. आ.उपयुक्त टक्केवारी. १००% सांडवा विसर्ग. ११७४५ क्युसेक्स आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
