Homeव्हिडिओ बातम्याप्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातुन अहिल्यानगर मध्ये जिल्हास्तरीय मीडिया संमेलन

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातुन अहिल्यानगर मध्ये जिल्हास्तरीय मीडिया संमेलन

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातुन

अहिल्यानगर मध्ये जिल्हास्तरीय मीडिया संमेलन…
जामखेड प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातुन अहिल्यानगर मध्ये जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापना या विषयावर मीडिया संमेलन व कार्यशाळेचे रविवार दि.२० जुलै, २०२५ रोजी सकाळी ते १०: ३० ते १:०० या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनात आपल्या दैनिकातील पत्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत. पेन पत्रकारितेपासून पेनलेस पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्‍वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पुनर्स्थापित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापना आणि पेन ते पेनलेस (डिजिटल) पत्रकारितेचा प्रवास या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.या विचार मंथनासाठी अहिल्यानगर जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज्‌ मीडिया प्रभागातर्फे करण्यात आले आहे. या संमेलनासाठी ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंटआबू (राजस्थान) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव, मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, याबरोबरच या संमेलनात सहभागी ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधींचेही विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
या संमेलनासाठी वृत्तपत्रे आणि प्रिंट मीडिया, टि.व्ही,, रेडिओ, केबल, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सायबर/सोशल मीडिया, तसेच पत्रकारिता आणि मीडिया शिक्षण देणा-या संस्था, जनसंपर्क, जाहिरात आदि क्षेत्रातील मीडिया प्रतिनिधी होणार आहेत. सर्व दैनिकांचे संपादक कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनासाठी सर्व सहभागींचा विशेष सन्मान करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
संमेलनानंतर सर्व पत्रकार बांधवांसाठी ब्रह्माभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संमेलनासाठी आपली व आपल्या पत्रकार बांधवांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तरी या संमेलनात आपण व आपल्या पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्‍वरी दिदी यांनी केले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!