Homeव्हिडिओ बातम्यापावसामुळे नगरपरिषद गळ्याचा स्लँब कोसळला :दुकानदाराचे नूकसान भरपाईची मागणी

पावसामुळे नगरपरिषद गळ्याचा स्लँब कोसळला :दुकानदाराचे नूकसान भरपाईची मागणी

पावसामुळे नगरपरिषद गळ्याचा स्लँब कोसळला
दूकानदाराची भरपाईची मागणी

जामखेड प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या जोरदार पाऊसामुळे जामखेड शहरातील नगरपरिषद शाॅपींग सेंटरच्या गाळ्याचे स्लॅब सिलींग कोसळुन व्यावसायिकाचे मोठे नूकसान झाले आहे.
जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तत्कालीन ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांना व्यावसाय करण्यासाठी चाळीस गाळ्यांचे व्यापारी संकुल बांधलेले आहे.
तपनेश्वर रोडवर २० व भाजी बाजार सामोर २० असे ४० गाळे आहेत. याठिकाणी अनेक व्यापारी नगर परिषदेला भाडे भरून आपला व्यवसाय करत आहेत.
भाजी बाजाराकडील वरच्या मजल्यावर दोन नंबर गाळ्यामध्ये गोरख लोखंडे यांचे डि आर टेलर्स नावाने टेलरिंगचे दूकान आहे दि २६ रोजी रात्री जामखेड शहरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे या दुकानाचे स्लॅबचे सिलींग कोसळले या घटनेत दुकानातील शिलाई मशीन ग्राहकांचे कपडे याच बरोबर इतरही वस्तुंचे नुकसान झाले आहे.
लोखंडे यांनी सदर घटनेची माहिती नगरपरिषदेला कळवली व संबधित विभागाचे इंजिनियर यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली
तरी घटनेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मला मदत मिळावी अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.
गाळ्याच्या स्लॅबबरोबरच जिना स्लॅबही गळुन पडला आहे. त्यामुळे तो जिन्हा धोकादायक बनला आहे त्यामुळे नगरपरिषदेने ताबडतोब याची पहाणी करून दुरूस्ती करावी अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!