त्या साहेबांना सांगा, त्या साहेबांकडे गेलो तर माझ्याकडे नाही, ते साहेब नाहित ते आले की त्यांना सांगा. अरे काय चाललय हे ??
जामखेड बस स्थानकातील शौचालय बंद:
प्रवाशांच्या गैरसोयीकडे कूणाचेच नाही लक्ष
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बस स्थानकाच्या व प्रवाशांच्या गैरसोयीबाबत अनेक समस्या व तक्रारी आहेत मात्र समस्या ना आमदार ऐकतात, ना संबधित आधिकारी कर्मचारी ऐकतात! . प्रवाशांनी जायचे कूठं हा मोठा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून शौचालय बंद आहे.
त्याठिकाणी देखरेख करणारी व्यक्ती तेथे नाही. शौचालयात पाणी नाही. महिला व पुरुषांना लघवीसाठी जाण्यासही नको नको वाटते एवढी दूर्गधी व वास त्या ठिकाणी येत आहे.महिला बिचारया कुठ बसावं हा विचार करत परत फीरतात. फार लाजिरवाणी बाब आहे.
जामखेडच्या दृष्टीने. प्रवाशांच्या या गैरसोयीकडे आगार व्यवस्थापकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जामखेड सारख्या प्रवाशांच्या वर्दळीच्या ठिकाणी शौचालय बंद आहे. या गंभीर बाबी कडे सामाजिक राजकीय कार्यकर्ते ही कधी डोकावून पहातांना दिसत नाहीत.
एसटी कर्मचाऱ्यांना विचारले असता त्या साहेबांना सांगा त्या साहेबांकडे गेलो तर माझ्याकडे नाही, ते साहेब नाहित ते आले की त्यांना सांगा. अरे काय चाललय हे . कोणीही जवाबदारीने बोलतांना दिसत नाही. नेमकी ही जवाबदारी कोणाची आहे हे कळेल का?
जामखेड तालुका म्हणजे शेजारच्या चार जिल्ह्यातील नागरिकांच्या येण्या जाण्याचे व मोठ्या वर्दळीचे ठिकाण आहे. आसपासच्या तालुक्यातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार मोठ्या प्रमाणावर ये जा करतात. त्यांच्यामुळेच जामखेडची बाजार पेठ व व्यवहार जीवंत आहेत.
मग या प्रवाशांच्या लघवीसाठी सूध्दा जागा व्यवस्थित देऊ शकत नाही कीती लाजिरवाणी गोष्ट आहे. आगार व्यवस्थापक, राजकीय, सामाजिक पुढारयांचे दूर्लक्ष आहे.
कोणी लक्ष देईल का ईकडे जरा???? .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
