जामखेड न्यायालयाकडून विवाहितेस तीस हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्यायालयाकडून विवाहितेस तीस हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर करण्यात आली आहे.
जामखेड न्यायालयात एका विवाहित महिलेने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १२५ एक नुसार पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जदारा तर्फे युक्तिवाद अँड बिपिन वारे यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद केला.
यावेळी अँड वारे यांनी युक्तिवाद करतांना सांगितले की विवाहितेचा व्यवस्थित संभाळ करण्याची जबाबदारी पासून सामनेवाले स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही तसेच सामने वाला यांचा उत्पन्नाचा स्रोत विचारात घेणे गरजेचे वाटते. त्याप्रसंगी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा रजनीश विरुद्ध नेहा या निर्णयाचा दाखला दिला शेवटी न्यायाधीश व्ही व्ही जोशी साहेब यांनी दोन्ही पक्षांची परिस्थिती, राहणी मान व सामनेवाले यांचे उत्पन्न व अर्जदाराची गरज लक्षात घेऊन विवाहितेस रुपये ३०,००० अंतरिम पोटगी मंजूर केली.
याप्रसंगी विवाहिता तर्फे अँड बिपिन वारे यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला. याप्रसंगी अँड सागर मोरे व ॲड अरबाज सय्यद यांनी सहाय्यक वकील म्हणून काम पाहिले.
————————
सदरचा आदेश करत असतांना न्यायाधीश व्ही व्ही जोशी साहेबांनी सद्यस्थितीच्या तरुण विवाहित जोडप्यांच्या कुटुंब व्यवस्थेवर चिंता व्यक्त करून तरुण विवाहित जोडप्यांनी सामंजस्याने एकमेकांसोबत कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215