साकत घाट की अपघात घाट??
मार्बलचा ट्रक पलटी, ड्रायव्हर गंभीर जखमी:
जामखेड प्रतिनिधी
साकत घाटात रस्ता अरुंद असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी मार्बलचा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे घाटात पलटी होउन ड्रायव्हर गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मार्बलचेही नुकसान झाले आहे. सौताडा घाटात महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वहातुक व प्रवास साकत मार्गे होत आहे मोठ्या प्रमाणावर होणारया वहातूकीमूळे साकत रोड खराब झाली आहे. साकत घाटात धोकादायक व अरूंद वळणावर सातत्याने अपघात होत आहेत.
दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान मार्बलचा ट्रक साकत मार्गी जामखेड कडे येत होता एकामागे एक असे तीन ट्रक बरोबर चालत होते. मधल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाने सरळ मोठ्या डोंगरावर ट्रक घातल्याने ट्रकची पलटी झाली यामध्ये एमुला पेदा बालू आंध्रप्रदेश हे ड्रायव्हर कँबीनमध्ये गुंतले होते. याचवेळी वाल्मिक नेमाने यांनी जामखेड वरून साकत कडे जात ही असतांना घटना पाहिली
. नेमाने व दोन्ही चालकांनी कँबीनमधून जखमी ड्रायव्हर वेमुला पेढा बाबू आंध्र प्रदेश
ला बाहेर काढले. व नेमाने यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.
कोठारी यांनी तातडीने रुग्णावाहिका पाठवली तसेच जखमी ड्रायव्हर ला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात मोठी मदत केली.
घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सरोदे पोलीस करीत आहे.
सिटीझन न्युज 9423391215