शाळेवर शिक्षक द्या अन्यथा पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवणार :- अँड अरूण जाधव
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालूक्यातील मोहा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ८वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात या शाळेत पाच शिक्षकांची नेमणूक आहे. सध्या मात्र फक्त दोनच शिक्षक इयत्ता १ ते ८ पर्यंतचे वर्ग सांभाळतात यामुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ लागलेला आहे, या शाळेत किमान तीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव यांनी १७ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकारी शुभम, जाधव तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मोहा येथील शाळेत निवारा बालगृहातील बहुतांश मुले व मुली शिकतात. शाळेचा दर्जा खालावत चालल्याने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटणार आहे ज्या मुलांना कोणी नाही अनाथ निराधार आहेत अशा मुलांचा संस्था लोक मदतीतून सांभाळ करते त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते कारण हे मुले स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे करिअर करतील पण दर्जाहीन शिक्षणामुळे या मुलांची अधोगती होण्यास उशीर लागणार नाही तेव्हा आणखीन तीन शिक्षकाची विनाविलंब मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेमणूक करावी या मुलाचे भविष्य सावरावे.
मोहा हे गाव जामखेड तालुक्यातील शेवटचे गाव आहे डोंगराळ भागामध्ये आहे या परिसरातील बरेच लोक ऊस तोडीला वीटभट्टीच्या कामासाठी उपजीविका करण्यासाठी स्थलांतरित होत असतात यामुळे मोहा परिसरातील लोक आपले मुलं आई आजोबांकडे ठेवून बाहेर गावाला कामासाठी जात असतात परंतु या शाळेच्या जवळच निवारा बालगृह नावाचे वस्तीगृह चालू आहे त्या बालगृहातील जवळपास ७५ मुले मुली शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे जात आहेत.
हे सर्व मुले मुली गोरगरीब कष्टकरी अनाथ निराधार आदिवासी भटके विमुक्त परिवारातील आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा गावातील आणि वस्तीगृहातील पट एकूण १२७ मुलं मुली शिक्षण घेत आहेत परंतु या मुलांचा पट पाहता त्या ठिकाणी फक्त दोन शिक्षक आहेत सर्व शिक्षण अभियान अंतर्गत कायद्याने एकूण पाच शिक्षक असणे गरजेचे आहे शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे १२७ मुलांना दोन शिक्षकांना शिकवणे सांभाळणे त्यांना ज्ञान देणे अशक्य झाले आहे त्या ठिकाणी फक्त दोनच शिक्षक काम करीत आहेत आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला शिक्षणाचा अधिकार सर्व शिक्षण अभियान अंतर्गत कायद्याने आम्हाला त्या ठिकाणी पाच शिक्षक असणे गरजेचे आहे .
ओ
मुलांच्या शिक्षणाची पातळी पूर्ण ढासळलेली आहे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे तातडीने तीन शिक्षक नियुक्त करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मुलांची शाळा भरवण्यात येईल जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत रोज या मुलांची शाळा पंचायत समिती जामखेड येथे भरवली जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.असा इशारा अँड अरूण जाधव यांनी दिला आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215