Homeव्हिडिओ बातम्यामाजी नगरसेवकाचे पोलीस ठाण्यातच विष प्राशन जामखेड बीड व्यवहार फसवणूक कनेक्शन :...

माजी नगरसेवकाचे पोलीस ठाण्यातच विष प्राशन जामखेड बीड व्यवहार फसवणूक कनेक्शन : जामखेड मधील प्रतिष्ठीतांचे नावाचा उल्लेख माजी नगरसेवक भरत जाधव मूळ गाव सोनेगाव ता जामखेड जि अ. नगर

माजी नगरसेवकाचे पोलीस ठाण्यातच विष प्राशन
जामखेड बीड व्यवहार फसवणूक कनेक्शन :

जामखेड मधील प्रतिष्ठीतांचे नावाचा उल्लेख
माजी नगरसेवक भरत जाधव मूळ गाव सोनेगाव ता जामखेड जि अ. नगर

जामखेड प्रतिनिधी

नवी मुंबईतील सी वुड्स भागातील माजी नागरसेवक भरत जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेपूर्वी स्वतःची व्यथा एका व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला होता. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले.

त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत आहेत. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली, असा आरोप जाधव यांनी केला आहे. एकंदरीत फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांसमोर विष घेण्यापूर्वी त्यांनी कारमध्ये बसून एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी ते म्हणाले, प्रचंड मानसिक तणावातून हे पाऊल उचलत आहे.
समाजात वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. २५ वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. काही लोकांनी दहशत करून काम बंद पाडले असे सांगितले. रमेश आजबे , युनुस सय्यद, बेबीशेन धनवडे यांच्या नावाचा उल्लेख आला आहे.

जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, तेथेही त्रास झाला. नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. आपली व्यथा मांडल्यावर अचानक खिशातील विषाची बाटली त्यांनी तोंडाला लावत विष प्राशन केल्याने पोलीस ठाण्यातही खळबळ उडाली. हि घटना शनिवारी घडली . विष प्राशन करण्यापूर्वी स्वतःच्या गाडीत त्यांनी स्वतःचा व्हिडीओ चित्रित केला होता. त्यात त्याच्यावर झालेल्या अन्याय त्यांनी कथन करीत मालमत्ता खरेदी विक्री रखडलेले प्रकल्प त्या मागून घेतलेले कर्ज, बँकेचे कर्ज त्याचे व्याज आदी बाबत व्यथा मांडली . बीड, कर्जत (जी रायगड) आणि जामखेड मध्ये फसवणूक झाली असा दावा त्यांनी व्हिडिओत केला आहे.

हा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमात प्रसारित केला मात्र काही वेळात तो डिलीट केला तरीही काही ठिकाणी व्हायरल झाला होता.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिलेल्या माहिती नुसार जाधव हे शनिवारी पोलीस ठाण्यात आले होते.

त्याची फसवणूक झाल्याबाबत त्यांनी व्यथा मांडली. आम्ही त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेत होतो. मात्र अचानक त्यांनी एक बाटली खिशातून काढली आणि त्यातील विष प्राशन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ कर्जत सरकारी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले गेले . कर्जत रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांनी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी भरत जाधव स्वतः वा त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!